छोटा शकील हाच मुख्य सूत्रधार, इक्बाल कासकरला शस्त्रखरेदीसाठी रसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 06:05 AM2017-09-28T06:05:55+5:302017-09-28T06:05:55+5:30

ठाणे पोलिसांचा मोर्चा आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार छोटा शकीलकडे वळला आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकर याची टोळी छोटा शकील चालवत असून, खंडणीच्या गुन्ह्यांचा तोच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Chhota Shakeel is the chief architect, Iqbal Kaskar's logistics for the purchase of weapons | छोटा शकील हाच मुख्य सूत्रधार, इक्बाल कासकरला शस्त्रखरेदीसाठी रसद

छोटा शकील हाच मुख्य सूत्रधार, इक्बाल कासकरला शस्त्रखरेदीसाठी रसद

ठाणे : ठाणे पोलिसांचा मोर्चा आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार छोटा शकीलकडे वळला आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकर याची टोळी छोटा शकील चालवत असून, खंडणीच्या गुन्ह्यांचा तोच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे इक्बालविरूद्ध मोक्का लावण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे.
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी इक्बाल कासकरसह तिघांना ठाणे पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी अटक केली होती. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात इक्बालच्या टोळीकडून खंडणी वसुलीचा उद्योग सुरू होता.
त्याच्या या धंद्याचा सूत्रधार छोटा
शकील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दाऊद भारतातून फरार झाल्यापासून डी-कंपनीची सूत्रे छोटा शकीलकडेच आहेत. इक्बाल कासकर हा दाऊदचा
भाऊ असल्याने खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये शकीलने त्याला मदत केली. शस्त्र खरेदीसाठीही त्याने इक्बालला पैसा पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. इक्बालच्या हवाला रॅकेटमध्येही शकीलचा सहभाग पोलिसांना आढळला आहे.
त्यामुळे दक्षिण आशियातील सर्वांत मोठा माफिया म्हणून कुख्यात असलेल्या छोटा शकीलच्या मुसक्या आवळण्यासाठी ठाणे पोलिसांनी हालचाल सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गांगरचा पोलिसांना गुंगारा
इक्बालच्या टोळीला आर्थिक रसद पुरवणाºयांमध्ये बोरीवली येथील पंकज गांगरचे नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तो फरार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाने बुधवारी न्यायालयामध्ये दिली.

पोलीस कोठडीत वाढ
इक्बाल कासकर, मुमताज इजाज शेख आणि इसरार अली जमील सैय्यद यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.टी. इंगळे यांच्या न्यायालयासमोर बुधवारी दुपारी हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली. न्यायालयात हजर केले तेव्हा नशाबाज इक्बालचे हात थरथरत होते.

भावाशी बोलण्यात गैर काय?
दाऊद हा इक्बालचा भाऊ आहे. त्यामुळे भावाशी बोलण्यात गैर काय, असा प्रश्न इक्बालचे वकील अ‍ॅड. श्याम केसवानी यांनी न्यायालयामध्ये केला.

Web Title: Chhota Shakeel is the chief architect, Iqbal Kaskar's logistics for the purchase of weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा