चंद्रकांत के. पवार ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 21:29 IST2020-06-14T21:29:22+5:302020-06-14T21:29:50+5:30
ठाणे लाचलुचपत विभागाने त्यांना लाच घेताना पकडले असून पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान विक्रमगडकरांनी फटाके वाजून आनंद साजरा केला आहे.

चंद्रकांत के. पवार ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक
हुसेन मेमन
जव्हार - विक्रमगड नगर पंचायतिचे प्रभारी मुख्याधिकारी तथा पालघर नायब तहसीलदार चंद्रकांत के.पवार यांना ठाणे लाचलुचपत विभागाने त्यांच्या फार्महाऊसवर रविवार दि. 14 जून रोजी सायंकाळच्या सुमारास लाच घेताना पकडले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सी. के. पवार हे महसूल विभागाचे अनुभवी अधिकारी असून मूळचे विक्रमगडचे रहिवासी आहेत, हे पालघर उपविभागीय कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असून, विक्रमगड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून दोन दिवसांपूर्वीच प्रभारी पदभार देण्यात आला होता, दरम्यान ठाणे लाचलुचपत विभागाने त्यांना लाच घेताना पकडले असून पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान विक्रमगडकरांनी फटाके वाजून आनंद साजरा केला आहे.
कोंदे या गावांमध्ये असलेल्या त्याच्या फार्म हाऊसमधील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करून देण्यासाठी त्यांची मागणी होती. संबंधित ठेकेदाराने हा रस्ता पाच फुटांच्या ऐवजी तीन फूट रुंदीचा व कमी अंतराचा केल्याबद्दल चंद्रकांत पवार यांची नाराजी होती. संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून त्यांना पकडले असून, याविषयी विक्रमगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.