शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

ठाण्यात १० ते १२ जूनला अतिवृष्टीची शक्यता; नागरिकांना प्रशासनाचा अलर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 21:05 IST

जिल्ह्यातील मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जावू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याखेरीज कुणीही घराच्या बाहेर पडू नये.

ठळक मुद्देघराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे.

ठाणे : ठाणे जिल्हयात  १० ते १२ जूनपर्यंत सोसाट्याचा वारा आणि अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे अचानक येणारा पूर किंवा भरतीच्या काळात अधिक पाऊस झाल्यास काही भाग जलमय होण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका संभवतो. यावर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी अलर्ट राहण्याचे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जावू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याखेरीज कुणीही घराच्या बाहेर पडू नये. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तसेच समुद्र, खाडी, नदी किनारी धोकादायक भागात, पूर क्षेत्रात असल्यास तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबतघेवून स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घर दरड कोसळण्याच्या भागात असेल, तिव्र उतारावर असेल , सैल मातीच्या भागात असेल किंवा धोकादायक धरणाच्या खालील भागात असेल तर तात्काळ जवळच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. तसेच जनावरांना कुठल्याही पध्दतीने बांधून ठेवू नये.

संबंधीत नागरीकांनी आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी दुरचित्रवाणी वरील बातम्या तसेच भ्रमणध्वनीवरील अधिकृत मेसेजेस आणि जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या संदेश पाहावेत. सोबत आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.पिण्याचे पाणी शुध्दीकरण करुन वापरावे.म्हणजे पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे. डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी मच्छर अगरबत्ती, मच्छरदाणीचा वापर करण्यास सांगितले आहे.

 ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात. सद्यस्थितीत जिल्हयात Covid Quarantine / isolated  काँरंटाईन,आयसोलेटेडअसलेले नागरीक व वादळवाराचे पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवतांना एकमेंकात मिसळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे..

मदत आवश्यक असल्यास आपले महानगरपालिका/जिल्हा नियंत्रण कक्षातील खालील दुरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा.जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे - ०२२-२५३०१७४०/२५३८१८८६, ठाणे महानगरपालिका - ०२२-२५३७१०१०,नवी मुंबई महानगरपालिका - ०२२-२७५६६१६२,कल्याण - डोंबिवली डोंबिवली महानगरपालिका - ०२५१-२२११३७३, मिरा भाईदर महानगरपालिका ०२२-२८११७१०२/०४उल्हासनगर महानगरपालिका - ०२५१-२७२०१४३,भिवंडी निजामपूर महानगरपालिका - ०२५२२-२३२३९८ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणेweatherहवामान