वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 13:15 IST2020-06-05T13:15:15+5:302020-06-05T13:15:23+5:30

विशेष म्हणजे या महिलांनी स्वताच खड्डे खणून त्यात वडाची रोपे लावली आहेत

Celebrate Vatpoornima by planting Vada trees | वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी

वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी

डोंबिवली: जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा निमित्ताने डोंबिवलीतील मिलापनगर महिला मंडळातर्फे पाच वडांचा झाडांचे प्रथम वृक्षारोपण करण्यात येऊन त्यानंतर त्यांनी त्याची रीतसर पूजा केली.

विशेष म्हणजे या महिलांनी स्वताच खड्डे खणून त्यात वडाची रोपे लावली आहेत. सदर वृक्षांची निगा व जोपासना यापुढेही त्या करणार आहेत. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण, कोरोनाचे आलेले संकट यामुळे वडा सारखी भरपूर ऑक्सिजन देणारी देशी झाडे यापुढे या महिलांच्या तर्फे लावण्यात येणार आहेत.

सदर वृक्षारोपण प्रसंगी मिलापनगर महिला मंडळाचा अध्यक्षा वर्षा महाडिक, उपाध्यक्षा संध्या चोळकर, सुहासिनी वाळके, शोभा कामथ, मीना कुलकर्णी, सीमा देशपांडे, संध्या सप्रे, उत्तरा गोगटे, भारती मराठे या महिला उपस्थित होत्या.

Web Title: Celebrate Vatpoornima by planting Vada trees