सुरक्षेची काळजी घेऊनच दहीकाळा साजरा करा - देवेंद्र फडणवीस

By नितीन पंडित | Updated: September 7, 2023 23:10 IST2023-09-07T23:10:11+5:302023-09-07T23:10:37+5:30

या दहीहंडी उत्सवाला गदर फेम बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिनेदेखील हजेरी लावत उपस्थित गोविंदांसह प्रेक्षकांची मने जिंकली.

Celebrate Dahikala by taking care of safety - Devendra Fadnavis | सुरक्षेची काळजी घेऊनच दहीकाळा साजरा करा - देवेंद्र फडणवीस

सुरक्षेची काळजी घेऊनच दहीकाळा साजरा करा - देवेंद्र फडणवीस

भिवंडी : दहीहंडी हा सण प्रेमाचा उत्साहाचा व आनंदाचा सण असून हा सण साजरा करताना गोविंदांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. गुरुवारी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर,आमदार निरंजन डावखरे, भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक सुमित पाटील,शराध्यक्ष हर्षल पाटील,माजी शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वरूण राजाने मागील अनेक दिवसांपासून उसंत घेतली होती, मात्र गोविंदा रस्त्यावर उतरल्याने वरूण राजाने आशीर्वाद दिला. वरूण राजाचा आशीर्वाद आपल्या सोबत सदैव आहे असेही फडणवीस यांनी यावेळी सांगत गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मंत्री कपिल पाटील यांनी चांदीची गदा भेट देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला.

या दहीहंडी उत्सवाला गदर फेम बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिनेदेखील हजेरी लावत उपस्थित गोविंदांसह प्रेक्षकांची मने जिंकली.

 सकाळपासून सुरू असलेल्या कपिल पाटील फाउंडेशनची दहीहंडी फोडण्यासाठी एकूण चार गोविंदा पथकांनी आठ थर लावून सलामी दिली होती त्यानंतर चिठ्ठी काढून आम्ही शेलारकर या गोविंदा पथकाला हि हंडी फोडण्याचा मान देण्यात आला.

Web Title: Celebrate Dahikala by taking care of safety - Devendra Fadnavis