बेकायदा सिलेंडर वापरून रस्ता-पदपथवर खाद्य पदार्थ बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2023 15:05 IST2023-04-10T15:05:46+5:302023-04-10T15:05:56+5:30
मीरारोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद बोरसे , हवालदार राकेश मोरे व अमितकुमार जाधव हे गस्त घालत होते.

बेकायदा सिलेंडर वापरून रस्ता-पदपथवर खाद्य पदार्थ बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल
-धीरज परब
मीरारोड: रस्ते व पदपथ वर सार्वजनिक ठिकाणी लोकांची सुरक्षितता धाब्यावर बसवून गॅस सिलेंडर वापरून खाण्याच्या हातगाड्या लावणाऱ्या दोघांवर मीरारोड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
रविवारी रात्री मीरारोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद बोरसे , हवालदार राकेश मोरे व अमितकुमार जाधव हे गस्त घालत होते. त्यावेळी रामदेवपार्कच्या स्प्रिंग रोझ इमारती बाहेरील पदपथावर गॅस सिलेंडरचा वापर करून चायनीज खाद्य पदार्थ बनवून विकत होता . त्याच्या कडे त्याचा परवाना नसल्याने पोलिसांनी रमेश जगदीशप्रसाद कुमार (२८) ह्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल करून एच पी चा गॅस सिलेंडर जप्त केला आहे.
दुसऱ्या गुन्ह्यात रामदेव पार्कच्या गौसिया मदरसा जवळ किस्मतली इस्माईल राइली (२८) हा हातगाडीवर गो गॅस कंपनीचा सिलेंडर वापरून खाद्य पदार्थ बनवत होता . मानवी जीविताच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी न घेता विना परवाना व्यवसाय केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून सिलेंडर पोलिसांनी जप्त केला आहे.