भाजपा कार्यकर्ता दाम्पत्यावर तरुणास बेदम मारहाण केल्या बद्दल गुन्हा दाखल
By धीरज परब | Updated: December 21, 2025 23:22 IST2025-12-21T23:21:27+5:302025-12-21T23:22:06+5:30
Mira Bhayandar News: एका तरुणाला तो अमली पदार्थची नशा करतो सांगून त्याचा व्हिडीओ बनवून बेदम मारहाण करून पाठीचे हाड फ्रॅक्चर केल्या प्रकरणी अखेर काशिमीरा पोलिसांनी एका महिन्या नंतर भाजपाच्या माजी नगरसेविकेचा मुलगा, सून ह्या भाजपा कार्यकर्त्यांसह अन्य दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

भाजपा कार्यकर्ता दाम्पत्यावर तरुणास बेदम मारहाण केल्या बद्दल गुन्हा दाखल
मीरारोड - एका तरुणाला तो अमली पदार्थची नशा करतो सांगून त्याचा व्हिडीओ बनवून बेदम मारहाण करून पाठीचे हाड फ्रॅक्चर केल्या प्रकरणी अखेर काशिमीरा पोलिसांनी एका महिन्या नंतर भाजपाच्या माजी नगरसेविकेचा मुलगा, सून ह्या भाजपा कार्यकर्त्यांसह अन्य दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पेणकरपाडा भागातील राहणार फिर्यादी रोहित धरमचंद देसर्डा ( वय २५) नुसार, मीरारोडच्या पेणकरपाडा स्मशानभूमी जवळ भवानी नगर येथे महापालिकाचे सार्वजनिक शौचालय आहे. त्या शौचालयाच्या पहिल्या मजल्यावर तो व गावातील ओमकार गोसावी, कुणाल नलावडे हे शौचालयासाठी गेले असता सिगारेट ओढत होते. त्यावेळी माजी भाजपा नगरसेविका अनिता पाटील यांचा मुलगा तथा भाजपा कार्यकर्ता निलेश पाटील व त्याची पत्नी श्वेता पाटील, मामे भाऊ दीपेश चौहान सह रायन फर्नांडिस यांनी येऊन शिवीगाळ मारहाण केली. चौहान याने स्टंपने मारहाण करून पाठीचे हाड फ्रॅक्चर केले. सदर घटना १४ नोव्हेम्बर रोजी घडली होती. या घटनेची श्वेता व निलेश पाटील यांनी समाज माध्यमांवर अमली पदार्थांची नशा करणारे यांना पकडून दिल्याचे प्रसिद्ध केले होते. दरम्यान मारहाणी नंतर रोहित हा पाठीचे हाड फ्रॅक्चर झाल्याने रुग्णालयात उपचार घेत होता. २० डिसेम्बर रोजी त्याने फिर्याद दिल्या नंतर काशिमीरा पोलिसांनी निलेश व श्वेता पाटील सह रायन फर्नांडिस, दीपेश चौहान यांच्यावर विविध कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे.