उल्हासनगर आशेळेपाडा येथील ४ बोगस डॉक्टरावर गुन्हा दाखळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 20:48 IST2025-07-12T20:48:09+5:302025-07-12T20:48:29+5:30
उल्हासनगर महापालिकेने गेल्या वर्षी बोगस डॉक्टरा विरोधात मोहीम सुरु करून २६ डॉक्टरांना नोटीस देऊन १६ पेक्षा जास्त डॉक्टरावर गुन्हे दाखल केले.

उल्हासनगर आशेळेपाडा येथील ४ बोगस डॉक्टरावर गुन्हा दाखळ
उल्हासनगर : कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे कोणतीही वैधकीय व्यवसाय पदवी नसताना विनापरवाना क्लिनिक चालविणाऱ्या चार बोगस डॉक्टरा विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महापालिकेने बोगस डॉक्टरा विरोधात मोहीम उघडल्यावर या डॉक्टरांचा पर्दापाश झाला आहे.
उल्हासनगर महापालिकेने गेल्या वर्षी बोगस डॉक्टरा विरोधात मोहीम सुरु करून २६ डॉक्टरांना नोटीस देऊन १६ पेक्षा जास्त डॉक्टरावर गुन्हे दाखल केले. डॉ श्रीकुष्ण तुकाराम कुमावत या बोगस डॉक्टरांचे नाव महापालिकेच्या २६ जणांच्या यादीत होते. मात्र कुमावत यांचे क्लिनिक आशेळेपाडा एसएसटी कॉलेज येथे असून ही हद्द कल्याण-डोंबिवली महापालिका मध्ये येत असल्याने कारवाई टळली होती. मात्र डॉ कुमावत यांच्या बाबतची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका आरोग्य विभागाला दिली होती. अखेर एका वर्षानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे डॉ राकेश अरुण गाजरे यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
विठ्ठलवाडी पोलिसांनी डॉ राकेश गाजरे यांच्या तक्रारीवरून डॉ श्रीकृष्ण तुकाराम कुमावत यांच्यासह त्यांच्या सोबत क्लिनिक मध्ये काम करणारे डॉ चंदर रोहरा, डॉ अरुण भाकरे, डॉ सुरेश मुरलीधर पिलारे या बोगस डॉक्टरा विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमन १९६० चे कलम १८८, ४१९, ४२० सह वैद्यकीय व्यवसाय अधिनियमन १९६१ चे कलम ३३ प्रमाणे गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत