शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

शिवीगाळ करणाऱ्या भाजप नगरसेविकेवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

मीरा रोड : शिवसेनेच्या महिला उपशहर संघटक तेजस्वी पाटील यांना अपशब्द वापरून शिवीगाळ व धमकावल्याप्रकरणी भाजप नगरसेविका नयना म्हात्रेंविरोधात ...

मीरा रोड : शिवसेनेच्या महिला उपशहर संघटक तेजस्वी पाटील यांना अपशब्द वापरून शिवीगाळ व धमकावल्याप्रकरणी भाजप नगरसेविका नयना म्हात्रेंविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, भाजप नगरसेवक विनोद म्हात्रेंविरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राई गावात राहणाऱ्या पाटील यांनी १५ जूनला प्रभाग २३ मध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने कीटकनाशक फवारणी करण्यासाठी महापालिका व आमदार गीता जैन यांना लेखी निवेदन दिले होते. १७ जूनला मुर्धे येथील रेव आगर परिसरात कीटकनाशक फवारणी सुरू असताना नगरसेविका म्हात्रे यांनी तेथे येऊन पाटील यांना अपशब्द वापरून शिवीगाळ केली. यानंतर शनिवारी राई गावात भाजप नगरसेवक विनोद म्हात्रे यांनीही तेजस्वी यांना दम दिला.

म्हात्रे यांचा अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आमदार जैन यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी आदींनी भाईंदर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मुकुट राव पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तेजस्वी यांचा जबाब नाेंदवून पुरावा म्हणून सादर केलेल्या व्हिडिओ क्लिपची पडताळणी केली. त्यानंतर विविध कलमांनुसार रविवारी रात्री नयना म्हात्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.