शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

मांजर मारल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:19 AM

ठाण्यातील वृंदावन या उच्चभ्रू सोसायटीमध्ये मांजराला अज्ञात व्यक्तीने मारल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : ठाण्यातील वृंदावन या उच्चभ्रू सोसायटीमध्ये मांजराला अज्ञात व्यक्तीने मारल्याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जमिनीत पुरलेले मांजरीचे शव काढून मारहाणीचे अवलोकन करण्यासाठी ते भिवंडी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

वृंदावन सोसायटीमधील नीलेश मालवीय हे परेल येथील एका नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांची पत्नी पूनम या प्राणिप्रेमी असून त्या भटक्या प्राण्यांची काळजी घेतात. त्यांची मोठी मुलगी जिया (१४) हिला ते वास्तव्यास असलेल्या इमारत क्रमांक-८४ मधील ‘बी’ विंगच्या आवारामध्ये एक बेवारस मांजर आढळली. त्यांनी काळजीपोटी तिला घरी आणले. १४ जानेवारी २०१९ रोजी सकाळी या मांजरीने तीन गोंडस पिलांना जन्म दिला. त्यानंतर, या मांजरीला कोणीतरी लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये सापडली. इमारतीच्या आवारामध्ये या कुटुंबाने तिचा दफनविधीही केला. या प्रकरणाची माहिती मिळताच आणखी एक प्राणिप्रेमी राहुल कुडतरकर यांनी मालवीय कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या आग्रहाने नीलेश मालवीय यांनी याप्रकरणी कलम ४२९ अन्वये राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

कायद्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे मांजरीची हत्या झाल्याची माहिती होऊनही शवविच्छेदनापूर्वीच तिला मालवीय कुटुंबाने पुरल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून, मारेकऱ्याचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले.याआधीही मांजरीची हत्याठाण्यातील कासारवडवली भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये सोळाव्या मजल्यावरून विदेशी जातीच्या मांजरीला एका रहिवाशाने फेकल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना तीन आठवड्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी मारेकºयाला कासारवडवली पोलिसांनी अटक केली होती.