शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

भुयार खोदून बँक दरोडा प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 2:58 PM

भुयार खोदून बँकेवर दरोडा घातल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँक ऑफ बडोदावरील दरोडयाने सर्वांनाच चक्रावून टाकले आहे.

ठळक मुद्देलॉकर फोडून ऐवज लुटून पळ काढण्यापूर्वी वापरलेला गाळा त्यांनी ओल्या फडक्याने पुसून काढल्याचे समजते.

नवी मुंबई - भुयार खोदून बँकेवर दरोडा घातल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे. बँक ऑफ बडोदावरील दरोडयाने सर्वांनाच चक्रावून टाकले आहे. कारण दरोडयासाठी भुयार खोदून बँकेच्या आत शिरण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला.  भुयार खोदण्यासाठी वापरलेला गाळा व बँक यांमध्ये केवळ तीन गाळ्यांचे अंतर आहे. सोमवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर सुमारे तीस फूट लांब भुयार पाहून सर्वांना धक्काच बसला होता. 

जर बँकेला सुरक्षारक्षक असता तर हा प्रकार निदर्शनास आला असता आणि बँकेची लूट टळली असती. जर बँकेला रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक असता, तर त्यांच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या असत्या. दरोडेखोरांनी भुयार खोदताना निघालेले डेब्रिज टाकले कुठे, असाही प्रश्न पोलिसांना पडला होता. अखेर भुयाराचे ते डेब्रिज घटनास्थळापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर नाल्यालगत टाकल्याचे आढळून आले आहे. 

रात्रीच्या वेळी गोणीत भरून त्या ठिकाणी ते टाकले जायचे. या वेळी त्यांना आजूबाजूच्या कोणीच हटकले नाही. याबाबतदेखील शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.  बँक ऑफ बडोदाला रात्री अथवा दिवसासाठी सुरक्षारक्षक नेमलेला नव्हता. केवळ एटीएम सेंटरच्या ठिकाणी फक्त दिवसापुरती एक वृद्ध व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून नेमलेली होती. रात्री कोणीही सुरक्षारक्षक नव्हता.  

लॉकर फोडून ऐवज लुटून पळ काढण्यापूर्वी वापरलेला गाळा त्यांनी ओल्या फडक्याने पुसून काढल्याचे समजते. तर लॉकर तोडताना आवाज होऊ नये याकरिता स्क्रू ड्रायव्हरने ते उघडण्यात आल्याचेही सूत्रांकडून समजते. अन्यथा प्रत्येक लॉकरचे दोन्ही टाळे तोडण्यासाठी त्यांना अधिक वेळ लागला असता व ते जास्त लॉकर फोडू शकले नसते. एकंदर या घटनेचा तपास करणे हे पोलिसांपुढे आव्हान बनले आहे. तपासादरम्यान बँकेबाहेरील एका सीसीटीव्हीमध्ये तीन दरोडेखोर दिसून आले आहेत. मात्र कॅमेरापासून तोंड लपवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न करून पोबारा केला 

गेनाविरोधात पुरावा नाहीबँकेलगतचा गाळा मिळवण्यासाठी गेना प्रसाद नावाने भाडेकरार करण्यात आला होता. मात्र ही व्यक्ती गाळा ताब्यात घेतल्यानंतर तो सहका-यांच्या ताब्यात देऊन पसार झालेली आहे. भाडे करारावरील त्याच्या छायाचित्राशिवाय कसलाही ठोस पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.