निष्काळजी अधिकाऱ्यास अभय का? मैदानावर दफनविधीप्रकरणी मनसेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 01:04 IST2019-05-09T01:04:28+5:302019-05-09T01:04:44+5:30
वर्तकनगर येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडावर काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मियांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना घडली होती. ही बाब निंदनीयच आहे.

निष्काळजी अधिकाऱ्यास अभय का? मैदानावर दफनविधीप्रकरणी मनसेचा सवाल
ठाणे : वर्तकनगर येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडावर काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मियांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना घडली होती. ही बाब निंदनीयच आहे. परंतु, तेवढीच चूक ही त्या जागेबाबत निष्काळजीपणा बाळगणा-या महापालिका अधिकाऱ्यांचीही आहे. यामुळे त्यांच्याविरोधात प्रशासन कोणती कारवाई करणार? असा सवाल मनसेने केला आहे.
मैदानासाठी आरक्षित भूखंडात अनधिकृतरित्या दफनविधी केल्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे असा आरोप मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला. याबाबत संबंधितांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. या जागेचा टीडीआर हिरानंदानी विकासकाला मिळाल्याने खेळाचे मैदान ठामपाच्या मालकीचे आहे. त्यामुळे त्याची देखभाल करणे, भोवती कुंपण घालून त्याची काळजी घेणे हे पालिकेच्या संबंधित अधिकाºयांचे कर्तव्य आहे. मात्र, त्यांच्या या निष्काळजीपणामुळे दफनविधी सारखा भयंकर प्रकार घडला. ज्या अधिकाºयांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे तेदेखील दफनविधी करणाºयांएवढेच दोषी आहेत असे ते म्हणाले.
तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी ख्रिश्चन धर्मीयांना लेखी पत्राद्वारे ३० हजार चौ. फूट क्षेत्र स्मशानभूमीकरीता देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्यास संबंधित अधिकारी वर्ग, श्रेय घेण्यासाठी पुढेपुढे करणारे लोकप्रतिनिधीअकार्यक्षम ठरले आहेत. सर्वधर्मीयांना अंत्यविधीकरिता जागा उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य आहे.