सरनाईक यांच्या निधीतून मीरा- भाईंदर महापालिकेस कार्डियाक रुग्णवाहिका व मोक्ष रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:23 PM2021-07-13T16:23:39+5:302021-07-13T16:25:02+5:30

सरनाईक यांच्या आमदार निधीतून मिळालेल्या १ कार्डियाक ऍम्ब्युलन्स व १ मोक्षरथ सोमवारी पालिका मुख्यालयात आयुक्त दिलीप ढोले यांच्या कडे सोपवण्यात आल्या.  

Cardiac ambulance and Moksha Rath to Mira-Bhayander Municipal Corporation from Shivsena MLA Pratap Saranaik's fund | सरनाईक यांच्या निधीतून मीरा- भाईंदर महापालिकेस कार्डियाक रुग्णवाहिका व मोक्ष रथ

सरनाईक यांच्या निधीतून मीरा- भाईंदर महापालिकेस कार्डियाक रुग्णवाहिका व मोक्ष रथ

googlenewsNext

मीरारोड - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून घेतलेल्या कार्डियाक रुग्णवाहिका व वातानुकूलित मोक्षरथाचे लोकार्पण मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात करण्यात आले. ईडीचा ससेमिरा आणि कौटुंबिक कारणांनी गेले काही महिने सरनाईक शहरात आले नव्हते. १२ जुलै ते २४ जुलै या काळात शिवसेनेकडून 'शिवसंपर्क अभियान' राबवण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचे औचित्य साधत मीरा भाईंदर शहरात आज त्याचा शुभारंभ केल्याचे  सरनाईक म्हणाले. 

गेल्या वर्षी कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यावर नागरिकांना आरोग्यासह विविध सुविधा देण्यासाठी सरनाईक यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले. परंतु महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर अर्णब गोसावी, कंगना राणावत यांना प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेल्या सरनाईक व कुटुंबियांच्या मागे ईडी चा ससेमिरा व कौटुंबिक आजारपणं लागल्याने ते गेले काही महिने शहरात आले नव्हते. 

सरनाईक यांच्या आमदार निधीतून मिळालेल्या १ कार्डियाक ऍम्ब्युलन्स व १ मोक्षरथ सोमवारी पालिका मुख्यालयात आयुक्त दिलीप ढोले यांच्या कडे सोपवण्यात आल्या.  कार्डियाक ऍम्ब्युलन्स अत्याधुनिक असून त्यात ऑक्सिजनची सुविधा सह एक डॉक्टर , परिचारिका यांची बसण्याची सोय आहे. स्मशानभूमी वा दफनभूमी पर्यंत पार्थिव नेण्यासाठी वातानुकूलित 'मोक्षरथ' तयार करण्यात आला आहे. मीरा भाईंदर शहरात मोक्ष रथ २४ तास विनामूल्य सेवा देणार आहे. काहीवेळेस पार्थिव मूळ गावी घेऊन जायचे असते त्यावेळी शितपेटीची सुविधा असलेला वातानुकूलित मोक्षरथ वापरता येईल असे आ. सरनाईक म्हणाले. यावेळी मुख्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडालाच पण अनेकांनी मास्क घातले नव्हते. 

Web Title: Cardiac ambulance and Moksha Rath to Mira-Bhayander Municipal Corporation from Shivsena MLA Pratap Saranaik's fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.