शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विक्रीकर बुडवणा-या टोळीचा पर्दाफाश, १३ राज्यांचे बनावट सी फॉर्म जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 04:30 IST

बनावट सी फॉर्मच्या आधारे विक्रीकर बुडवणाºया आंतरराज्य टोळीचा ठाणे पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ राज्यांचे बनावट सी फॉर्म जप्त करण्यात आले आहेत.

 ठाणे : बनावट सी फॉर्मच्या आधारे विक्रीकर बुडवणाºया आंतरराज्य टोळीचा ठाणे पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ राज्यांचे बनावट सी फॉर्म जप्त करण्यात आले आहेत.नियमानुसार ज्या व्यापाºयाकडून माल विकत घेतला, त्याने स्वत:च्या राज्यात कर भरला असेल, तर माल घेणाºयास पुन्हा कर भरावा लागत नाही. त्यासाठी ज्याच्याकडून माल घेतला, त्याने कर भरल्याचा सी फॉर्म विक्रीकर विभागाला द्यावा लागतो. असे बनावट सी फॉर्म बनवून त्यांची विक्री करणाºया एकाची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली. ठाणे रेल्वे स्थानकावरील हॉटेलमध्ये तो येणार असल्याने पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. रमेश कांतिलाल शाह (वय ६७) असे त्याचे नाव असून तो बनावट सी फॉर्म कांदिवलीतील नीलेश सेठ (वय ५०) याला विकणार होता. त्यानुसार पोलिसांनी सेठलाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सी फॉर्म बनावट असल्याचे विक्रीकर विभागाने स्पष्ट झाले. अहमदाबाद येथील अशोककुमार मिश्रा व सांताक्रूझ येथील आशिषकुमार दुबे यांनाही आरोपींनी फॉर्म विकल्याचे चौकशीतून समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अशोक मिश्राला अहमदाबाद तर आशिष दुबेला सांताकू्रझ येथून अटक केली.बनावट सी फॉर्मसाठीचे साहित्य पोलिसांनी कांदिवलीतील शाहच्या कार्यालयातून जप्त केले. केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब अशा १३ राज्यांचे बनावट सी फॉर्म आरोपीजवळ तयार होते. ते देखील जप्त केले आहेत.पोलीस चौकशी सुरूअहमदाबाद येथील अशोक मिश्रा याने २०१२-१३ मध्ये वापरलेल्या बनावट सी फॉर्मच्या १५ छायांकित प्रती तसेच पुढील वर्षात वापरण्यासाठी केलेल्या काही बनावट सी फॉर्मच्या प्रतीही पोलिसांना मिळाल्या. आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा