भिवंडीतील बापगाव येथील निर्जन ठिकाणी १३ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या
By नितीन पंडित | Updated: December 24, 2024 15:02 IST2024-12-24T15:02:00+5:302024-12-24T15:02:04+5:30
भिवंडी- कल्याण सीमेवरील गांधारी पुलानजीकच्या बापगाव या गावातील कब्रस्ताना परिसरातील निर्जन स्थळी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

भिवंडीतील बापगाव येथील निर्जन ठिकाणी १३ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या
भिवंडी - भिवंडी- कल्याण सीमेवरील गांधारी पुलानजीकच्या बापगाव या गावातील कब्रस्ताना परिसरातील निर्जन स्थळी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एक १३ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजता पासून बेपत्ता असल्याने पालकांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. या अपहरण झालेल्या मुलीचा शोध स्थानिक कल्याण पोलीस घेत असतानाच मंगळवारी सकाळी या मुलीचा मृतदेह बापगाव येथील कब्रस्तान नजीकच्या निर्जन स्थळी आढळून आला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तिची निर्घृण हत्या करण्यात आली असून,तिच्यावर अत्याचार सुध्दा केल्याची माहिती मिळत आहे. मागील काही दिवसात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असताना ही दुर्दैवी घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.