शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

त्यामुळे भावांनी केली बहिणीची हत्या, वडिलांवरही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 6:38 AM

वडिलांवरही गुन्हा दाखल : अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी

कल्याण : विवाहित बहिणीचे परपुरुषाशी असलेल्या अनैतिक संबंधावरून गावात व समाजात बदनामी झाल्याने वडिलांच्या सांगण्यावरून भावंडांनी तिची हत्या केल्याचा प्रकार तपासात उघड झाला. मृत महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासवले होते. परंतु, तिच्या कपड्यात सापडलेल्या सीमकार्डवरून तिच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यात कोळसेवाडी पोलिसांना यश आले.

कल्याण रेल्वे यार्डातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तेवीस वर्षीय महिलेचा मृतदेह १ जानेवारीला आढळला होता. तिची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. परंतु, सीमकार्डवरून तपास केला असता तिचे नाव मनिता यादव (रा. मौलानापूर, आजमगढ, उत्तर प्रदेश) आहे. ती घरातून चार दिवसांआधीच निघून गेली आहे. तिचा भाऊ तीर्थराज विक्रोळीत राहत असल्याचे समजले. तसेच ती बेपत्ता झाल्याची तक्रार उत्तर प्रदेशातील स्थानिक पोलिसात दाखल झाली होती.

दरम्यान, तीर्थराजच्या कॉल डिटेल्स रेकार्डवरून लोकेशन व कल्याण रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मनिता, भाऊ पप्पू,मनोज, हे कामायनी एक्स्प्रेसमधून ३१ डिसेंबरला पहाटे ३ वाजता कल्याणला उतरल्याचे दिसून आले. पहाटे ४.२१ चे फुटेज तपासले असता फक्त मनोज व तीर्थराज हे फलाटावर परतताना दिसले. मात्र, त्यात मनिता नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तीर्थराजची चौकशी करताच त्याने इतर भावांच्या साथीने मनिताची गळा दाबून हत्या केल्याचे सांगितले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे भासवल्याचे तो म्हणाला.एका भावाला अटकपोलिसांनी या हत्येप्रकरणी तीर्थराज, मनिताचे वडील लौटू यादव, रमाकांत ऊर्फ पप्पू व आतेभाऊ मनोज यादव अशा चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर, तीर्थराजला पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी