शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

भाई मेरे पर नाराज है! आपले भारतात एकही बँक अकाउंट नाही, इक्बाल कासकरचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 5:45 AM

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी दोन वर्षांपूर्वी चार वेळा बोलणे झाल्याचा दावा करणा-या इक्बाल कासकर याने आपण व्यसनाधीन असल्याने दाऊद आपल्यावर नाराज असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना दिली.

ठाणे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी दोन वर्षांपूर्वी चार वेळा बोलणे झाल्याचा दावा करणा-या इक्बाल कासकर याने आपण व्यसनाधीन असल्याने दाऊद आपल्यावर नाराज असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना दिली. खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या कासकरच्या बँक अकाउंटबद्दल चौकशी केली असता आपले बँक अकाउंटच नसल्याची लोणकढी थापही त्याने मारली.बिल्डरकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला कासकर दररोज उलटसुलट दावे करत असून पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. इक्बालने आपला भंगारचा धंदा असल्याचे सांगितले. तसेच तो राहत असलेल्या परिसरात त्याचा एक दुकानाचा गाळा असून त्याने तो भाड्याने दिला आहे. महिनाकाठी त्याचे ३० ते ४० हजार रुपये भाडे येते. त्यावरच आपला उदरनिर्वाह सुरू असल्याचा हास्यास्पद दावा त्याने केला आहे. आपल्याला वेगवेगळी व्यसने असून त्यामुळे दाऊद आपल्यावर नाराज असल्याचे त्याचे म्हणणे आहे. दाऊदबद्दल दररोज नवनवी तसेच परस्परविरोधी माहितीदेऊन पोलिसांना गोंधळात टाकण्याची सराईत गुन्हेगाराची कार्यशैली कासकरने अवलंबली आहे.मुंबईत, राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुकच्या अनावरण कार्यक्रमात दाऊद हा आजारी असल्याचे व त्यामुळे तो स्वत:हून भारतात येत असल्याचे म्हटले होते. इक्बालने मात्र दाऊदची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा केला आहे.पश्चाताप होतोय...कराचीत दाऊदचे तीन बंगले असून एका बंगल्यात दाऊद आणि अनिस हे दोघे कु टुंबासह वास्तव्य करतात. उर्वरित दोन बंगल्यांत त्यांचे साथीदार राहतात. माझ्या परिवाराने मला मुंबईत राहू नको. दुबईलाच थांब, असे सांगितले होते. परंतु, मी त्यांचे ऐकले नाही. त्याचा आज पश्चात्ताप होत असल्याचेही कासकरने पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील बिल्डर, सोने-चांदी व्यापारी यांच्याकडे इक्बालने मोठमोठ्या रकमांची खंडणी मागितल्याच्या तक्रारी असल्याने पोलिसांनी कासकरकडे त्याच्या बँक खात्याबाबत वारंवार विचारणा केली असता त्याने आपले बँक खाते नसल्याची चक्क थाप मारली. माझे बँक खाते असते, तर मी दिलेला धनादेश कोणी स्वीकारला असता का, असा शहाजोग सवाल इक्बालने पोलिसांना केल्याचे समजते.पेट्रोलपंप घोटाळ्याच्या तपासामुळे झाले दुर्लक्षकासारवडवली येथील खंडणी प्रकरण हेमे महिन्यातील आहे. याबाबत ठाणे खंडणीविरोधी पथकाबरोबर अन्य गुन्हे शाखेचे युनिट माहिती गोळा करत होते. मात्र, पेट्रोलपंप घोटाळ्यामुळे या प्रकरणाकडेथोडे दुर्लक्ष झाले. या प्रकरणाची माहिती गोळा करत असलेल्या सर्व अधिकाºयांची शनिवारी पोलीस उपायुक्तांनी तातडीनेबैठक बोलावली होती.दाऊदबद्दल दररोज नवनवी तसेच परस्परविरोधी माहिती देऊन पोलिसांना गोंधळात टाकण्याची सराईत गुन्हेगाराची कार्यशैली कासकरने अवलंबली आहे. 

टॅग्स :Policeपोलिस