रायतेजवळ उल्हास नदीवरील पूल वाहून गेल्याने वाहतूक अद्याप ठप्पच 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 04:10 PM2019-08-05T16:10:34+5:302019-08-05T16:11:00+5:30

तत कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीला महापूर आला होता. यात कल्याण तालुक्यातील रायते जवळ असणाऱ्या उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता.

As the bridge over the Ulhas River near Raiata flows, the traffic is still blocked | रायतेजवळ उल्हास नदीवरील पूल वाहून गेल्याने वाहतूक अद्याप ठप्पच 

रायतेजवळ उल्हास नदीवरील पूल वाहून गेल्याने वाहतूक अद्याप ठप्पच 

Next

- उमेश जाधव 

टिटवाळा -  सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीला महापूर आला होता. यात कल्याण तालुक्यातील रायते जवळ असणाऱ्या उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. पाणी ओसरल्यानंतर पुला लगतच्या रस्त्याचा काही भाग वाहून गेला असल्याची बाब निदर्शनास आली. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू. 

दोन दिवसापासून कल्याण तालुक्याला पावसाने झोडपून काढल्यामुळे येथील काळू, भातसा व उल्हास या तिन्ही नद्यांना महापूर आल्याने तिन्ही नद्यांवरील पुल पाण्याखाली गेले होते. उल्हास नदीवरील पुराचे पाणी ओसरल्यावर पुलाला जोडा असणारा रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याची बाब निदर्शनास आली. 26 जुलै रोजी झालेल्या पुरात देखील हाच भाग वाहून गेला होता. 27 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे मुरबाड येथील दौऱ्यावर येणार असल्या कारणास्तव हा भाग त्यावेळेस तात्काळ दुरुस्त करण्यात आला होता. शनिवारी व रविवारी झालेल्या पुरात सदर रस्ता पुन्हा एकदा वाहून गेल्याने या कल्याण मुरबाड नगर मार्गावरील दोन दिवसापासून आजपर्यंत ठप्प आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा रांगा लागल्या आहेत. 

सध्या या वाहून गेलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. लवकरच हा रस्त्याचा भाग दुरुस्त केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: As the bridge over the Ulhas River near Raiata flows, the traffic is still blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.