शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

श्वासाच्या झुंझीशी लढणारे मुकुल गरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 03:33 IST

रुग्णांना करतात समुपदेशन; आर्थिक मदतही दिली मिळवून

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याणमध्ये राहणारे मुकुल गरे यांच्या हृदयाला छिद्र होते. त्याचे निदान उशिरा झाले. त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी दोनच वर्षे जगू शकाल, असे सांगितले. मात्र, ते आता ५० वर्षांचे आहेत. हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना उपचारासाठी त्यांनी समुपदेशन तसेच मागदर्शन करून मदत मिळवून दिली आहे.आईच्या गर्भात असतानाच गरे यांच्या हृदयाला छिद्र होते. मात्र, १६ व्या वर्षी त्याचे निदान झाले. हृदयाच्या झडपांनाच छिद्र असल्याने त्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. ते दोनच वर्षे जगतील, असे डॉक्टरांनी सांगितले होते. गरे यांनी शालेय व पदवी शिक्षण घेतल्यावर मेडिकल रिप्रेंझेटेटिव्हची नोकरी पत्करली. हृदयाला छिद्र असल्याने त्यांनी लग्नाचा विचार केला नाही. मात्र, ४० व्या वर्षी त्यांनी एका विधवा महिलेशी विवाह केला. तिला त्यांनी तिच्या मुलासह स्वीकारले. त्यांचा वैद्यकीय व्यवसायाशी तसा चांगला संबंध आला.हृदयाला छिद्र असलेल्यांना काय त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव गरे यांना होती. हा आजार मुलाला आईच्या गरोदरपणात होतो. आईने चुकीचे औषध उपचार घेतल्यास, तसेच फास्टफूड व बदलती आहारशैली यामुळेही हा आजार होतो. पूर्वी याचे निदान लवकर होत नव्हते. मात्र, आता निदानाचे प्रमाण वाढले आहे. हृदयाला छिद्र असलेल्यांना गरे समुपदेशन करतात. उपचारासाठी आर्थिक कुवत नसलेल्यांना ते राजीव गांधी आरोग्य योजनेतून उपचारासाठी मदत मिळवून देतात. काही वर्षांपासून त्यांचे हे काम सुरू आहे. गरे यांना हृदयविकार तज्ज्ञ चैतन्य गोखले यांची मदत मिळते. त्याचबरोबर त्यांनी ‘झुंज श्वासाशी’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याची दुसरी आवृत्ती निघाली आहे.गरे म्हणाले, रायपूर येथील मोठ्या रुग्णालयात हृदयाच्या छिद्रावर शस्त्रक्रिया होते. परंतु, तेथे प्रतीक्षा यादी जास्त आहे. त्यामुळे निदान झाले आणि तातडीने शस्त्रक्रिया झाली, असे होत नाही. एका रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. सामान्यांना हा खर्च परवडत नाही. राज्य सरकारने मुंबईत या आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी रायपूर रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णालय उभे करावे, अशी मागणी गारे यांनी केली आहे. त्याचा फायदा खेड्यापाड्यातील रुग्णांना होऊ शकतो. त्यासाठी रायपूरला जाण्याची गरज भासणार नाही.सव्वासहा लाख रुग्णगरे म्हणाले, हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना प्राणवायू कमी मिळतो. हिमोग्लोबिन वाढते. दर वेळी २५० ते ३०० मिलीलिटर रक्त काढावे लागते. भारतात एक लाख लोकांमागे ५० जणांना हा आजार आढळून येते. सध्या देशात या आजाराचे सव्वासहा लाख रुग्ण आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणHealthआरोग्य