पोलीस व्हॅनचा अचानकच ब्रेक फेल, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:35 PM2021-10-17T17:35:11+5:302021-10-17T17:36:23+5:30

पोलीस वाहनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह

The brakes of the police van failed, fortunately a major accident was averted in ulhasnagar | पोलीस व्हॅनचा अचानकच ब्रेक फेल, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

पोलीस व्हॅनचा अचानकच ब्रेक फेल, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Next
ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्या समोर उभी असलेली पोलीस वॅन सकाळी श्रीराम चौकाकडे जात होती. व्हॅनमध्ये ऑनड्युटीवरील पोलीस बसले होते

सदानंद नाईक 

उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलिसांची व्हॅन सकाळी श्रीराम चौक परिसराच्या दिशेने जात असताना ब्रेक फेल झाल्याने व्हॅन बंद पोलीस कॉटर्सच्या संरक्षण भिंतीला धडकली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्या समोर उभी असलेली पोलीस वॅन सकाळी श्रीराम चौकाकडे जात होती. व्हॅनमध्ये ऑनड्युटीवरील पोलीस बसले होते. पोलीस ठाण्याच्या पुढे गेलेल्या व्हॅनचे ब्रेक फेल असल्याचे चालकाच्या लक्षात आले. भरधाव व्हॅन बंद असलेल्या पोलीस कॉटर्सच्या सरंक्षण भिंतीला जोरदार धडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून घटनेत कोणतीही जिवीतहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही. व्हॅनचे काही प्रमाणात नुकसान झाले. व्हॅनला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन आणण्यात आली. या घटनेने पोलीस वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलिसांची वाहने सुरक्षित नसून पोलिसांना नवीन वाहने देण्याची गरज असल्याचे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.

Web Title: The brakes of the police van failed, fortunately a major accident was averted in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app