शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

खवल्या मांजराची ४० लाखांत तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 6:30 AM

परदेशात तस्करी : ठाणे मध्यवर्ती शोध पथकाची कामगिरी

ठाणे : दुर्मीळ प्रजातीच्या खवले मांजराची ४० लाखांमध्ये विक्री करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध कक्षाच्या पथकाने मंगळवारी जेरबंद केले. सागर पवार (३३, फलपाडा, विरार, जि. पालघर ) आणि अब्दुल महामृत (५४, रा. साई, जि. रायगड) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून खवल्या मांजर या वन्यजीवाची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करण्यासाठी सागर आणि अब्दुल येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार शरद तावडे यांना मिळाली होती. त्या आधारे ठाण्याच्या वनक्षेत्रपालांशी पत्रव्यवहार करून वन विभागाचे कर्मचारी घेऊन मंगळवारी दहिसर मुंब्रा या भागात अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एका प्लास्टिकच्या गोणपाटातून नामशेष होत चाललेले संरक्षित वन्यजीव खवले मांजर (इंडियन पॅन्गोलिन) हस्तगत केले. त्यांनी ते दहा लाखांमध्ये खरेदी केले होते. त्याची ते परदेशामध्ये ४० लाखांमध्ये विक्री करणार होते, त्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. त्यांच्याशी निगडीत आणखी कोणती टोळी आहे का? ते याची विक्री कोणाला करणार होते? आदींबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.यापूर्वीही झाली होती तस्करीयापूर्वीही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने खवल्या मांजराची तस्करी करण्यासाठी आलेल्या देवजी सावंत, संजय भोसले आणि रामदास पाटील या तिघांना ठाण्यातील साकेतकडून बाळकूमकडे जाणाºया रस्त्यावर १२ आॅक्टोंबर २०१८ रोजी अटक केली. त्यांच्याकडूनही खवले मांजर हस्तगत केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस