उद्यापासून पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलन, दिग्दर्शकाशी गप्पा रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 06:53 IST2026-03-19T06:53:17+5:302026-03-19T06:53:52+5:30

‘लोकमत’च्या साहित्य पुरस्कारांचे हे सातवे वर्ष आहे. मागील महोत्सवात साहित्य रसिकांनी कोरम मॉलमधील पुस्तक प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद देत लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली होती. याहीवेळी लोकमत मॅजेस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या पुस्तक प्रदर्शनात मराठीतील एकाहून एक सरस साहित्यकृती खरेदी करता येतील. 

Book exhibition, poets' conference, chat with director to be held from tomorrow | उद्यापासून पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलन, दिग्दर्शकाशी गप्पा रंगणार

उद्यापासून पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलन, दिग्दर्शकाशी गप्पा रंगणार

ठाणे : साहित्य क्षेत्रातील मानाचे पान असलेल्या ‘लोकमत’ साहित्य महोत्सवाला शुक्रवार, २० मार्चपासून ठाण्यात कोरम मॉलमध्ये सुरुवात होत आहे. हा महोत्सव २० ते २४ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी आणि ठाण्याचे सह-पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता होईल. 

लोकमत’च्या साहित्य पुरस्कारांचे हे सातवे वर्ष आहे. मागील महोत्सवात साहित्य रसिकांनी कोरम मॉलमधील पुस्तक प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद देत लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली होती. याहीवेळी लोकमत मॅजेस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या पुस्तक प्रदर्शनात मराठीतील एकाहून एक सरस साहित्यकृती खरेदी करता येतील. 

शुक्रवार २० मार्च, संध्याकाळी ५ वा : युवा कवींचे संमेलन. ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे संमेलनाचे अध्यक्ष, तर ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे प्रमुख पाहुणे असतील. ठाण्याचे भूषण असलेले बागवे यांचा पंचाहत्तरीनिमित्त डुंबरे यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. युवा कवी कॅप्टन वैभव दळवी, आदित्य दवणे, रेश्मा कारखानीस, गीतेश शिंदे, विनय शिर्के, संजय शिंदे, शिवानी गोखले, प्रकाश बोर्डे, सुप्रिया हळबे कविता सादर करतील.

शनिवार, २१ मार्च, संध्याकाळी ५.३० वा : ‘लोकमत मॅजेस्टिक गप्पा’ प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांची संवेदनशील चित्रपट दिग्दर्शक विजू माने घेतील मुलाखत. 
रविवार, २२ मार्च, दुपारी ३.३० वा : लोकमत सखी सदस्यांचा ‘सखी कलामहोत्सव’ कार्यक्रम. ठाण्याचे जिल्हाधिकारी 
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ प्रमुख पाहुणे असतील. ‘सखे गं साजणी’ मराठी चित्रपटातील कलावंत प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिजित खांडकेकर लोकमत सखी सदस्यांच्या भेटीला येणार आहेत.

Web Title : कल से पुस्तक मेला, कवि सम्मेलन, निर्देशक से बातचीत का आयोजन

Web Summary : ठाणे में कल से 'लोकमत' साहित्य महोत्सव शुरू हो रहा है, जिसमें स्पृहा जोशी द्वारा उद्घाटन किए जाने वाले पुस्तक प्रदर्शन शामिल हैं। महोत्सव में अशोक बागवे के साथ कविता सत्र और निर्देशक रवि जाधव के साथ बातचीत शामिल है। 'सखे ग सजनी' के कलाकारों के साथ 'सखी कलामहोत्सव' भी आयोजित किया जाएगा।

Web Title : Book Fair, Poetry Fest, Director Chat to Enthral from Tomorrow

Web Summary : The 'Lokmat' Literature Festival starts tomorrow in Thane, featuring book exhibitions inaugurated by Spruha Joshi. The festival includes poetry sessions with Ashok Bagwe, and a conversation with director Ravi Jadhav. A 'Sakhi Kalamahotsav' with artists from 'Sakhe G Sajni' will also be held.