मैत्री जपावी तर ती अशी! आजारी मित्राला भेटण्यासाठी जॉनी लिव्हर पोहोचले थेट रुग्णालयात
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 16, 2025 08:51 IST2025-07-16T08:49:31+5:302025-07-16T08:51:38+5:30
Thane: मित्राला भेटण्यासाठी जॉनी लिव्हर आले ठाण्यात, आपुलकीने केली विचारपूस

मैत्री जपावी तर ती अशी! आजारी मित्राला भेटण्यासाठी जॉनी लिव्हर पोहोचले थेट रुग्णालयात
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपल्या हास्याने सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या डी महेश या मित्राला भेटण्यासाठी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते हास्य सम्राट आज ठाण्यात आले होते. सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उच्चारासाठी दाखल असलेल्या महेश यांची जॉनी लिव्हर यांनी विचारपूस करून डॉक्टरांचे देखील आभार मानले. महेश यांचे पाच लाखांचे शस्त्रक्रिया डॉक्टर अमोल गीते यांनी विनामूल्य केली.
ट्रिपल वेसल डिसीज या आजाराने त्रस्त असलेले महेश दहा दिवसांपूर्वी सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाले होते. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून डॉक्टर अमोल गीते यांच्या रुग्णालयात ती पार पाडली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून त्यांनी ही शस्त्रक्रिया त्यांची विनामूल्य करून दिली. त्यांची ही बायपास सर्जरी यशस्वी झाली आणि जॉनी लिव्हर यांनी डॉक्टर गीते यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे आभार मानले. डॉक्टर गीते म्हणाले,"ही शस्त्रक्रिया अत्यंत जटिल होती, सुदैवाने ती यशस्वी पार पडली ही शस्त्रक्रिया करताना महेश वाचतील की नाही असा प्रश्न समोर होता परंतु आम्ही आमच्या प्रयत्नांनी ही सर्जरी यशस्वी केली. "
जॉनी लिव्हर यांनी महेश यांची चौकशी केली आणि 'तू अगदी ठणठणीत दिसत आहे' असे कौतुकद्वार देखील त्यांनी काढले. जॉनी लिव्हर प्रत्यक्ष भेटायला आल्यानंतर पाहून महेश देखील गहिवरले आणि त्यांनी जॉनी लिव्हर यांना मिठी देखील मारली. महेश यांच्या शस्त्रक्रियेचा आज सहावा दिवस होता आणि आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आले असे डॉक्टर गीते यांनी जाहीर केले.