शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

भाजपाची लगीनघाई : डोंबिवलीतील एकाच उद्यानाचे दोनदा झाले नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 6:16 AM

डोंबिवली : पूर्वेकडील न्यू आयरे रोड, म्हात्रेनगर परिसरातील उद्यानाचे ‘भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी उद्यान’ हे नामकरण वादाच्या भोवºयात सापडले आहे. भाजपाचे स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी मांडलेल्या या नामकरणाच्या ठरावाला महासभेत मान्यता मिळाली आहे. दरम्यान, आधीच या उद्यानाचे पांडुरंग दाजी मढवी व गणपत दाजी मढवी उद्यान असे नामकरण ठरावाद्वारे ...

डोंबिवली : पूर्वेकडील न्यू आयरे रोड, म्हात्रेनगर परिसरातील उद्यानाचे ‘भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी उद्यान’ हे नामकरण वादाच्या भोवºयात सापडले आहे. भाजपाचे स्थानिक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी मांडलेल्या या नामकरणाच्या ठरावाला महासभेत मान्यता मिळाली आहे. दरम्यान, आधीच या उद्यानाचे पांडुरंग दाजी मढवी व गणपत दाजी मढवी उद्यान असे नामकरण ठरावाद्वारे झालेले असताना भाजपाची ही लगीनघाई चर्चेचा विषय ठरली आहे. माजी नगरसेवक वसंत भोईर यांनी नामकरणाला हरकत घेतली असून त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे तक्रार केली आहे.भोईर हे नगरसेवक असताना २०१५ आॅगस्टमध्ये पांडुरंग दाजी मढवी व गणपत दाजी मढवी असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर झाला होता. उद्यानासाठी आरक्षित असलेली जागा ही मढवी यांची असल्याने त्यांच्या नामकरणाचा ठराव केल्याचे भगत यांचे म्हणणे आहे. परंतु, उद्यानाचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्याचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी १५ डिसेंबरला झालेल्या महासभेत पुन्हा नव्याने माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या नावाने प्रस्ताव देऊन नामकरणाचा ठराव मंजूर करून घेतल्याकडे भगत यांनी लक्ष वेधले आहे.२५ डिसेंबरला वाजपेयींच्या वाढदिवशी उद्यानाचे नामकरण करण्यात आले आहे. अटलबिहारी वाजपेयी हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्याबद्दल आमचा आक्षेप नाही. त्यांचे नाव अन्य कोणत्याही वास्तूला देता येईल. परंतु, ज्या स्थानिक नागरिकांची जमीन उद्यानासाठी आरक्षित केलेली आहे, त्यांचे नाव देण्याबाबत रीतसर ठराव केला असताना परस्पर नामकरण बदलण्याच्या निर्णयामुळे महासभेतील २०१५ च्या ठरावाचा अवमान झाला असल्याचे भगत यांचे म्हणणे आहे. ‘पांडुरंग दाजी मढवी व गणपत दाजी मढवी उद्यान’ असे नामकरण करून त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, असे विनंतीपत्र भगत यांनी महापौरांना दिले आहे. याची प्रत आयुक्त पी. वेलरासू, विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनाही देण्यातआली आहे.योग्य ती कार्यवाही कराभगत यांनी मुकुंद पेडणेकर यांच्या ठरावावर हरकत घेतल्यानंतर सचिव संजय जाधव यांनी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना पत्र पाठवून दोन्ही ठरावांच्या अनुषंगाने खातरजमा करून नामकरणाबाबत पुढील योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी विनंती केली आहे. या पत्राला नामकरण झालेल्या दोन्ही ठरावांच्या प्रती जोडण्यात आल्या आहेत.तेव्हा उद्यान हस्तांतरित झाले नव्हतेसंबंधित उद्यानाचे हस्तांतरण २०१७ ला झाले आहे. त्यामुळे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. २०१५ मध्ये ठराव झाला असलातरी त्यावेळी जागा ताब्यात नव्हती. त्यामुळे जागा हस्तांतर झाल्यानंतर आम्ही केलेला ठराव योग्य आहे. आपण आठ ते नऊ महिने अगोदरच नामकरणाचा प्रस्ताव दिला होता. ज्या मढवींची जागा घेतली आहे, त्याबाबत त्यांना महापालिकेने मोबदलाही दिला आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक पेडणेकर यांनी दिली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीBJPभाजपा