शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला; गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 17:25 IST

Ulhasnagar News : नातेवाईकसह नागरिकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली असून नालीचे चेंबर उघडे ठेवनाऱ्यावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी केली.

ठळक मुद्देयाप्रकाराने परिसरात एकच खळबळ उडून घातपाताची शक्यता व्यक्त होत आहे. नालीचे उघडे चेंबर ठेवणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

सदानंद नाईक

उल्हासनगर : सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या यश भुजंग या मुलाचा मृतदेह परिसरातील बंद कंपनीच्या उघड्या नाल्याचे चेंबरमध्ये रविवारी मिळाला. नातेवाईकसह नागरिकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली असून नाल्याचे चेंबर उघडे ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.उल्हासनगर कॅम्प नं-२ रमाबाई आंबेडकरनगर परिसरात ८ वर्षाचा  यश भुजंग आईसोबत राहत असून वडिलांचा मृत्यू झाला आहे.  यश हा २१ डिसेंबर रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घराच्या अंगणात खेळत होता. काही वेळाने मुलगा यश अंगणात दिसेनासे झाल्यानंतर, आईसह नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता, मिळून आला नाही. अखेर उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस व नातेवाईक यश याचा शोध घेत असताना तब्बल सात दिवसा नंतर रविवारी परिसरातील बंद कुकर कंपनीच्या उघड्या नाली चेंबर मध्ये यशाचा मृतदेह सापडला. याप्रकाराने परिसरात एकच खळबळ उडून घातपाताची शक्यता व्यक्त होत आहे. नालीचे उघडे चेंबर ठेवणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी घटनास्थळी घाव घेऊन, मृतदेह ताब्यात घेतला. घातपाताचा संशय व्यक्त होत असल्याने, मुलाचा मृतदेह मुंबईच्या जे जे रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी पाठविला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली. जे जे रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर, पुढील कारवाई करण्याचे संकेत दिले. तसेच पोलीस अधिक चौकशी करीत असल्याचे म्हणाले.

टॅग्स :Deathमृत्यूulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालय