बॉडी बिल्डिंग: सिक्स पॅकसाठी वापरणाऱ्या औषधांचा साठा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 08:52 IST2025-09-06T08:51:18+5:302025-09-06T08:52:00+5:30

Crime News: मिरा भाईंदर परिसरातील शरीर सौष्ठव करणा-या व्यक्तींना तसेच युवकांना सर्रास विक्री केली जात असलेल्या प्रतिबंधित औषधांचा साठा मीरा भाईंदर गुन्हे शाखेने जप्त केला आहे. मीरारोड पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Body building: Stock of drugs used for six pack seized | बॉडी बिल्डिंग: सिक्स पॅकसाठी वापरणाऱ्या औषधांचा साठा जप्त 

बॉडी बिल्डिंग: सिक्स पॅकसाठी वापरणाऱ्या औषधांचा साठा जप्त 

मीरारोड - मिरा भाईंदर परिसरातील शरीर सौष्ठव करणा-या व्यक्तींना तसेच युवकांना सर्रास विक्री केली जात असलेल्या प्रतिबंधित औषधांचा साठा मीरा भाईंदर गुन्हे शाखेने जप्त केला आहे. मीरारोड पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा भाईंदर गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे, सहायक निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक उमेश भागवत व संदीप शिंदे व पथकाने औषध निरीक्षक यांना सोबत घेऊन मीरारोडच्या कनकिया पोलीस ठाण्या समोर आकार सोसायटीतील के-५ फिटनेस अँड वेलनेस सेंटर वर धाड टाकली. 

त्या धाडीत टरमिवा या इंजेक्शनच्या ४०७ बाटल्या व इतर वेगवेगळ्या प्रकारची औषधे, इंजेक्शनस् बेकायदेशीरपणे साठा करून ठेवल्याचे आढळून आले. सदरचे दुकान हे कन्हैय्या वकिल कनौजिया याचे असल्याचे व अमन कृष्णा कनोजीया (वय १९) हा त्यठिकाणी काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. 

त्या नंतर पोलीस पथकाने कनौजियाच्या भाईंदर पूर्व येथील नर्मदा पॅरेडाईज मधील घरी छापा टाकला असता तेथून देखील सदर इंजेक्शनच्या २३३ बाटल्या सापडल्या. सदर औषधाच्या ६४० बाटल्या व इतर वेगवेगळ्या प्रकारची परिशिष्ठ एच या प्रवर्गात मोडत असलेली औषधे असा ३ लाख २२ हजारांचा साठा पोलिसांनी जप्त केला. सदर इंजेक्शन विनापरवाना खरेदी, विक्री व साठा करण्यास प्रतिबंध असताना बेकायदेशीरपणे कोणत्याही वैदयकीय व्यावसायिकाच्या लेखी चिठ्ठी शिवाय रक्तदाब स्थिर करण्याकरीता वापरले जाते. 

हे परिशिष्ठ एच प्रकारातील औषधाची गैरमार्गाने शरीर सौष्ठव करणा-या व्यक्तींना तसेच युवकांना सर्रास विक्री होत होती. सदर इंजेक्शन घेणाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होत असतो.

Web Title: Body building: Stock of drugs used for six pack seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.