शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

प्लास्टिकच्या ड्रममध्ये सापडला महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:58 AM

भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातून जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पाइपलाइन रोडवर २५ ते ३० वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृतदेह शनिवारी एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळला.

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातून जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पाइपलाइन रोडवर २५ ते ३० वर्षांच्या अनोळखी महिलेचा मृतदेह शनिवारी एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये आढळला. तीक्ष्ण हत्याराने हत्या करून तिचे अवयव छाटलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महिलेची ओळख पटू नये, यासाठी मारेकऱ्यांनी तिचे मुंडके धडावेगळे, तर दोन्ही पाय गुडघ्यापासून आणि उजवा हात काखेतूनच छाटला आहे. तिचा निर्वस्त्र मृतदेह एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून तो ड्रम तालुक्यातील सोनाळे गावच्या हद्दीत येणाºया मुंबई महापालिकेच्या पाइपलाइन रोडवर एका सह्याद्री रेडिमिक्स प्लान्टसमोर फेकून दिला होता. या अमानुष हत्याकांडाची माहिती पोलीस पाटील शत्रुघ्न पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्याला दिली. या घटनेची दखल घेत तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे हे तत्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी गेले. घटनास्थळाचा पंचनामा करून, मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या निर्घृण हत्येप्रकरणी अज्ञात मारेकºयांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजारे करत आहेत.