शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

डांबराचा काळा धंदा जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 4:35 AM

रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबराची चोरी आणि त्यामध्ये मार्बलच्या चुºयाची भेसळ करणारी टोळी सक्रिय असून, ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका ट्रकचालकास अटक केली. कळवा येथे गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

ठाणे -  रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबराची चोरी आणि त्यामध्ये मार्बलच्या चुºयाची भेसळ करणारी टोळी सक्रिय असून, ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका ट्रकचालकास अटक केली. कळवा येथे गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.कंत्राटदारांना डांबराचा पुरवठा करण्याचे काम हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (एचपीसीएल)मार्फत केले जाते. एचपीसीएल कंपनी डांबर स्वत: विकत असली, तरी त्याच्या वाहतुकीसाठी ट्रान्सपोर्ट कंपन्यांची मदत घेतली जाते. एचपीसीएलकडून टँकरमध्ये डांबर घेणे आणि ज्या कंत्राटदाराने मागणी केली, त्याला ते पोहोचविण्याचे काम ट्रान्सपोर्ट कंपन्या करतात. या वाहनांवरील चालक आणि क्लीनरच्या मदतीने डांबराची चोरी करून, त्यामध्ये मार्बलचा चुरा भेसळ करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी कळवा येथील पारसिक नाक्याजवळून एका ट्रक चालकास गुरुवारी रात्री अटक केली. आरोपीचे नाव मुकीम अब्दुल रहमान (३२) असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर जिल्ह्याचा, तर हल्ली चेंबूर येथे राहणारा आहे. ठाणे न्यायालयाने शुक्रवारी त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.डांबराचा भाव साधारणत: २0 हजार रुपये प्रतिटन आहे. एचपीसीएल कंपनीतून निघालेल्या डांबराच्या एका टँकरमधून साधारणत: दोन ते तीन टन डांबर आरोपी काढतात. ही भरपाई करण्यासाठी तेवढ्याच वजनाचा मार्बलचा चुरा कंटेनरमध्ये भरला जातो. हे काम कळंबोली भागात केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई हा या प्रकरणाचा केवळ पहिला टप्पा आहे. तपासातून या गोरखधंद्यात गुंतलेली मोठी टोळी उघडकीस येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. कळवा पोलीस ठाण्यात शुक्रवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.‘एचपीसीएल’चे पथक सहभागीपोलिसांनी या कारवाईची माहिती एचपीसीएलला दिली आहे. या कंपनीकडून दररोज किती आणि कुणाकुणाला डांबराचा पुरवठा केला जातो, त्यासाठी कोणकोणत्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांची मदत घेतली जाते, कंपनीमध्ये या कामाची जबाबदारी कुणाकुणावर आहे आदी मुद्द्यांच्या तपासासाठी पोलिसांना कंपनीची मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ठाणे पोलिसांनी एचपीसीएलचे कार्यकारी संचालक लक्ष्मण वेणुगोपाल यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार, कंपनीचे एक पथक ठाणे पोलिसांच्या मदतीसाठी लवकरच येणार आहे.२0 लाखांचा मुद्देमाल हस्तगतआरोपी मुकीम अब्दुल रहमान हा एचपीसीएलच्या मुंबई येथील डेपोमधून डांबर भरलेला टँकर घेऊन भिवंडी येथील वडपे येथे जात होता. वाटेत त्याने या टँकरमधील जवळपास २ टन डांबर क्लीनर आणि अन्य पाच-सहा आरोपींच्या मदतीने काढले. त्यानंतर, त्यामध्ये मार्बलची भेसळ करून टँकर वडपे येथे नेत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. टँकरचा क्लीनर मात्र फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीजवळून १५ लाखांचा टँकर आणि जवळपास ५ लाखांचे डांबर पोलिसांनी हस्तगत केले.कळंबोलीत लवकरच कारवाईडांबराचा काळा धंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. डांबरात काळ्या मार्बलचा चुरा मिसळण्याचे काम कळंबोली भागात केले जाते. त्यासाठी डांबरचोरांनी तेथे मोठे युनिट उभारल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. हे युनिट जप्त करण्याची कारवाई पोलीस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारthaneठाणे