शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

उपकेंद्राला २० कोटी देण्याच्या वादात आता भाजपाचीही उडी, शिवसेना, राष्ट्रवादीवर केली टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 2:44 PM

मुंबई विद्यापीठाच्या ठाण्यातील उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याच्या निर्णयावरुन शिवसेना आणि आयुक्तांमध्ये जुंपली असतांना त्यात राष्ट्रवादीनेही उडी घेतली. त्यानंतर आता भाजपाने सुध्दा यात उडी घेतली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी उफाळणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठळक मुद्देशिवसेनेवर केली टिकाराष्ट्रवादी केवळ आपली राजकीय पोळी भाजतेयं

ठाणे - मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला २० कोटी रुपयांच्या मुद्यावरुन सध्या महापौर विरुध्द आयुक्त आणि राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना असा वाद रंगला आहे. आता या वादात भाजपानेसुध्दा उडी घेतली आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयावर टीका करताना, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेलाही टोला लगावला आहे. २० कोटी देताना हा विषय महासभेत आणणे आवश्यक असताना तसे न करता आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला विरोध करून आयुक्तांना पाठिंबा देण्यामागे राष्ट्रवादीने केवळ आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.                मुंबई विद्यापीठाला २० कोटी देण्यावरून सध्या ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यापिठाला स्वत:चे अनुदान असताना पालिका आयुक्तांनी विद्यापीठाला २० कोटी रु पये देण्यापेक्षा हा निधी पालिका शाळांसाठी खर्च करावा अशी मागणी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे या निर्णयाला महापौरांनी विरोध दर्शवला असताना महापौरांना आणि पर्यायाने शिवसेनेला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आयुक्तांच्या निर्णयाला योग्य ठरवत त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता भाजपने देखील याबाबत आपली भूमिका व्यक्त केली असून त्यांनी देखील आयुक्तांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. प्रसार माध्यमांना पाठवण्यात आलेल्या एका छोट्याशा लेखामधून त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षावर टीका केली आहे .                  कुलगुरूंबरोबर झालेल्या बैठकीस पालकमंत्री किंवा सभागृहनेता यांना बोलाविले असते तर तेव्हासुध्दा महापौरांनी हीच भूमिका घेतली असती का हा प्रश्न जरी ठाणेकरांना त्रास देत असला तरी पुढे आयुक्तांनी विद्यापीठाला २० कोटी देण्याचा प्रस्ताव आणला आणि अर्थसंकल्पात बदल केला तर शिवसेनेचे सभागृह नेते व त्यांचे साथीदार पालकमंत्रांच्या आदेशानुसार महापालिकेच्या शाळा सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहेत हे सभागृहात म्हणायला कमी करणार नाहीत अशा प्रकारचा अनुभव मागील ४ वर्षात ठाणेकरांनी अनेकदा घेतला आहे. महापौरांची स्थिती निश्चितच ‘न घरका न घाटका’ अशी होण्याची चिन्हे असल्याची टिका पाटणकर यांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पेडणेकर यांनी या उपकेंद्रासाठी आयुक्तांना अर्थसहाय्य देण्याची विनंती केली व ती आयुक्तांनी मान्य केली. महापौरांनी त्यास विरोध दर्शविला, राष्ट्रवादी पक्षाने महापौरांना विरोध केला किंवा जास्त संयुक्तिक आयुक्तांना पाठिंबा दिला. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे हे जणू आपल्या रक्तात भिनले आहे असेच या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रि यांवरून सिद्ध होते. मुंबई विद्यापीठाला आर्थिक मदत या विषयाचा आयुक्तांना पाठिंबा कि शिवसेनेला विरोध असा विचार करणे विरोधी पक्ष किती अपरिपक्व आहे हेच दर्शविते किंवा शिवसेनेच्या विरोधात आयुक्तांना पाठिंबा देऊन आपली पोळी भाजून घ्यायची ही मानसिकता असल्याचे पाटणकर यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा