शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात अंबरनाथला भाजपचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:34 IST

आंदोलनात अंबरनाथ,बदलापूर तसेच ग्रामीण भागातून मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अंबरनाथ : जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना -काँंग्रेस- राष्ट्रवादी काँंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भाजपने मंगळवारी सकाळी अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात अंबरनाथ,बदलापूर तसेच ग्रामीण भागातून मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्पमुदतीची पीककर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे बहुसंख्य शेतकºयांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांबाबत कर्जमाफी योजनेत कोणताच उल्लेख नाही.गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महविकास आघाडी सरकारचा भाजप निषेध करत असल्याचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले.यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील, अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील, पश्चिम अध्यक्ष ,राजेश कौठाळे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता भोईर, माजी शहराध्यक्ष विजय खरे, नगरसेविका अनिता भोईर आदी उपस्थित होते.मुरबाडमध्ये निषेध मोर्चामुरबाड : शेतकºयांची फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार आणि लोकोपयोगी विकासकामांना स्थगितीदेण्याच्या विरोधात भाजपने मंगळवारी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे अंदोलन केले. यावेळी निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीकाही करण्यात आली.

टॅग्स :BJPभाजपा