शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

बहुमताच्या जोरावर प्रभाग समिती निधीवर डल्ला मारण्याची भाजपाची खेळी फसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 21:05 IST

शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा

मीरारोड - बहुमताच्या बळावर सत्ताधारी भाजपाने प्रभाग समिती निधीवर डल्ला मारत तो फक्त भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात वापरण्याचे प्रस्ताव मंजूर केल्याने शिवसेनाकाँग्रेस नगरसेवकांच्या हाती भोपळा दिला होता. गेल्या महिन्यातील लोकमतच्या वृत्तानंतर सेना, काँग्रेसने या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर पालिकेनेदेखील कायद्यातच प्रभाग समिती निधीच्या समान वाटपाची तरतूद असल्याचे स्पष्ट करत प्रभाग समितीचा निधी सम प्रमाणात वाटण्याचे पत्रच भाजपाच्या सर्व सहा प्रभाग समिती सभापतींना पाठवले आहे.

भाजपाने पालिकेत ६१ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवल्याने एकहाती व एकछत्री कारभार सुरु झाला आहे. प्रभाग समित्यांची रचना प्रशासनाने भौगोलिक रचनेनुसार केलेली असताना बहुमताच्या बळावर भाजपाने त्यात फेरबदल करुन काँग्रेस व सेनेच्या हाती मिळणारी प्रत्येकी एक प्रभाग समिती हिसकावून घेत या दोन्ही पक्षना झटका दिला. पालिकेतील सर्व सहाच्या सहा प्रभाग समित्या ताब्यात घेतानाच प्रभाग समिती निधी पूर्वीप्रमाणे प्रत्येक नगरसेवकास न देता नियमावर बोट ठेऊन प्रभाग समितीनिहाय निधीची तरतूद करण्याची खेळी भाजपाने केली.

सभापतींनी प्रभाग समितीनिहाय कामांचे प्रस्ताव आणताना सेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांचे प्रस्तावच घेतले नाही. आणि बहुमताच्या बळावर केवळ भाजपा नगरसेवकांची कामेच मंजूर करुन घेतली. आधीच सेना व काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामे डावलली जात असताना आधीच्या निधीतील कामेसुध्दा झालेली नाहीत. त्यातच चालू वर्षातील प्रभाग समिती निधीमध्ये देखील भाजपाने वाटमारी केल्याने सेना व काँग्रेसचे नगरसेवक हवालदिल झाले होते.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यापासून थेट मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागा पर्यंत या प्रकारा बद्दल तक्रार केली होती. सेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनीसुध्दा आयुक्तांची या प्रकरणी भेट घेतली होती. त्यातच कहर म्हणजे आयुक्तांनीच महापौर दालनात बसलेल्या आमदार मेहतांना भेटा, असा सल्ला सेना नगरसेवकांना दिल्याने आमदार सरनाईक व सेना नगरसेवक संतापल्याची चर्चा चांगलीच रंगली.

अखेर आयुक्तांनीच नियमातील तरतुदीनुसार प्रभाग समिती निधी प्रत्येक प्रभागातील कामांसाठी सम प्रमाणात देण्याची भूमिका घेतली. त्यासाठी नियमातील तरतूद स्पष्ट करणारे व निधी सम प्रमाणात कामांसाठी वापरण्याचे पत्रच भाजपाच्या सर्व सभापतींना कार्यकारी अभियंता दिपक खांबित यांनी दिले आहे. या मुळे प्रभाग समिती एकट्याने लाटण्याच्या भाजपाच्या मनसुब्यांना आयुक्त व प्रशासनाने धक्का दिला आहे.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना