शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

 भ्रष्टाचार दडपण्यासाठी भाजपाने विरोधकांचा आवाज दाबला, शिवसेना आणि काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 21:01 IST

Mira Bhayander Municipal Corporation News : भाजपाने महापालिकेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिलेले नियम ज चे प्रस्ताव चर्चेला घेतले नाहीत असा आरोप महासभे नंतर शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन महासभेत सत्ताधारी भाजपाने महापालिकेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिलेले नियम ज चे प्रस्ताव चर्चेला घेतले नाहीत असा आरोप महासभे नंतर शिवसेनाकाँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे .महासभेसाठी नियम ज अन्व्ये आमदार गीता जैन यांनी १०० कोटी रुपयांच्या मोकळ्या जागांवरील कर वसुली थकबाकीचा मुद्दा घेतला होता . काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम व थेट २०२२ सालच्या महापालिका निवडणुकीसाठी मंडप , खुर्च्या आदी चे १२ कोटी ७१ लाखांचे कंत्राट देण्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा प्रस्ताव दिला होता .काँग्रेस आघाडीचे नगरसेवक राजीव मेहरा यांनी मीरारोडच्या भारतरत्न इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात वरच्या दोन मजल्यांच्या कामासाठी सुमारे साडे पाच कोटी रुपयांचे कंत्राट दंडिलें असून त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्या मुद्दा ज च्या प्रस्तावा खाली दिला होता .परंतु सत्ताधारी भाजपाने विरोधी पक्षांचे हे प्रस्ताव चर्चेला न घेताच ते फेटाळून लावले . त्यामुळे विरोधी पक्ष नेते प्रवीण पाटील , शिवसेना गटनेत्या नीलम ढवण , काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार , नगरसेवक अनिल सावंत , राजीव मेहरा , मर्लिन डिसा , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत आदींनी सत्ताधारी भाजपा वर आरोप केले आहेत .महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्या पासून भ्रष्टाचाराने कळस गाठला असून शहराची अवस्था बिकट करून टाकली आहे . नागरिक समस्या व भ्रष्टाचाराने त्रासले असून बांधकाम विभाग , नगररचना विभाग आदी भ्रष्टाचाराचे मोठे अड्डे बनल्याचा आरोप इनामदार व सावंत यांनी केला आहे . भाजपाचे ह्या भ्रष्टाचारात संगनमत असल्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रकार केला जात आहे . पण ह्या विरोधात शासना कडे दाद मागणार असा इशारा सामंत यांनी दिला आहे .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस