शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर टोलनाका हटवण्याच्या शिंदेसेनेच्या प्रयत्नांना भाजपाकडून ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:47 IST

दहिसरचा टोलनाका हा स्थलांतर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी वनमंत्री गणेश नाईक सह भाजपाच्या विरोध नंतर दहिसर टोलनाका अन्यत्र हलवण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे.

मीरारोड- दहिसरचा टोलनाका हा स्थलांतर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी वनमंत्री गणेश नाईक सह भाजपाच्या विरोध नंतर दहिसर टोलनाका अन्यत्र हलवण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील वरसावे खाडी पुला पलीकडे नायगाव हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका संयुक्तिक नसल्याचे स्पष्ट केले आहे.  भाजपाने दहिसर टोलनाका हटवण्या वरून शिंदेसेना आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोंडी करून धक्का दिल्याचे मानले जात आहे.  

दहिसर येथील टोलनाकामुळे गेली अनेक वर्ष वाहतूक कोंडीचा सामना मीरा भाईंदर सह वसई विरार व अन्य भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा टोलनाका हटवण्याच्या मागण्या आणि आश्वासने अनेक राजकीय पक्ष व नेत्यांनी दिली. आंदोलने झाली मात्र टोलनाका काही हटला नाही. परिवहन मंत्री झाल्यावर सरनाईक यांनी टोलनाका विरुद्ध आक्रमक पवित्रा घेत टोलनाका हटवणारच असे सातत्याने जाहीर केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे बैठक घेऊन टोलनाका अन्यत्र हलवण्याचा निर्णय पण झाला. 

सुरुवातीला टोलनाका वरसावे महामार्गावर स्थलांतराचा विषय झाला व नंतर वरसावे खाडी पूल पलीकडे नायगाव हद्दीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गावर नेण्याबाबत चर्चा झाली. मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह येथे पाहणी देखील केली. मात्र भाजपाचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांनी, दहिसरचा टोलनाका  सदर दोन्ही ठिकाणी होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली. भाजपचे माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी तर टोलनाका वरसावे येथे होऊ देणार नाही सांगत आंदोलनाचा इशारा दिला. लोकांची बैठक घेतली. वरसावे येथे टोलनाका होऊ देणार नाही अशी भूमिका घेतानाच दुसरीकडे दहिसर टोलनाका स्थलांतरित झाला नाही म्हणून प्रश्न वैती यांनी उपस्थित केला. सासुनवघर आदी भागातील काँग्रेस नेते विजय पाटील, त्यांचे पुतणे भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील यांनी देखील महामार्ग प्राधिकरणचा निषेध करत टोलनाका खाडी पलीकडे महामार्गावर उभारण्यास विरोध चालवला. 

भाजपाकडून टोलनाका अन्यत्र उभारण्यास विरोध केला जात असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मंत्री सरनाईक यांना लेखी पत्र देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील महामार्गवर टोलनाका उभारणीस नकार दिला. मंत्री सरनाईक यांनी गडकरी यांना भेटून टोलनाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गावर हलवण्याची मागणी केली होती. त्यावर गडकरी यांच्या पत्रात, दहिसर टोलनाका स्थलांतर मुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दोन टोलप्लाझामधील अंतर हे ३० किमी पर्यंत होईल. राष्ट्रीय महामार्गावर गैर राष्ट्रीय टोलप्लाझाचे स्थलांतर हे राष्ट्रीय टोल धोरणांशी सुसंगत नाही. दहिसर टोलनाका वरील गर्दी कमी करण्यासाठी तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारातील महामार्गावर स्थलांतरित करण्या ऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना गडकरी यांनी केली आहे. 

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पत्राने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गावर दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याचा मार्ग बंद झाला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील, टोलनाका हटवल्याचे मंत्री सरनाईक यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडवली आहे. मंत्री सरनाईक यांनी टोलनाका हटवणार असे दिलेले आश्वासन हे टोलनाका ५ - १० फूट हटवून पूर्ण केले आहे. त्यांनी ट्राफिक हटणार कि नाही हे सांगितले नव्हते असा चिमटा आ. मेहतांनी काढला आहे. 

इतक्या वर्षांची सर्वात मोठी दहिसर टोलनाक्याची समस्या दूर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. त्यामुळे मीरा भाईंदर, वसई विरार सह हजारो लोकांची वाहतूक कोंडीच्या जाचातून सुटका झाली असती. मात्र टोलनाका हटवण्याचे श्रेय शिवसेनेला मिळू नये व जनतेचे टोलनाका मुळे होणारे हाल सुरूच रहावेत असे काही राजकीय नेत्यांना वाटत असल्याने त्यांनी विरोध केला असे शिंदेसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम प्रताप सिंग यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP halts Shinde's efforts to remove Dahisar toll plaza.

Web Summary : BJP blocked Shinde's plan to move Dahisar toll due to opposition. Gadkari opposed relocating it near Naigaon. Traffic woes continue for Mira Bhayandar residents.
टॅग्स :BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेGanesh Naikगणेश नाईकmira roadमीरा रोडtollplazaटोलनाका