शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

VIDEO: भाजपाच्या माजी महापौर आणि नगरसेविकेत जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 10:02 AM

भाजपाच्या माजी महापौरांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा भाजपाच्याच नगरसेविकेचा प्रयत्न

मीरारोड : माजी महापौर तथा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या इच्छुक असलेल्या गीता जैन यांच्या हस्ते ठेवलेल्या छत्री वाटपाच्या कार्यक्रमात स्थानिक भाजपा नगरसेविका रुपाली मोदी व त्यांच्या पतीने चांगलाच गोंधळ घातला. धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाली. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक देखील नगरसेविकेवर नाराज झाले. रुपाली या आ. मेहता समर्थक असून मेहता व जैन यांच्यातील वादंगातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.हाटकेश भागात राहणारे इमरान हाश्मी यांनी शनिवारी सायंकाळी हाटकेश चौक येथे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. उघड्यावरच एक टेबल त्यासाठी मांडला होता. माजी महापौर गीता जैन यांच्या हस्ते छत्री वाटप ठेवले होते. जैन या तेथे पोहचल्या असता छत्री वाटपावेळी पाऊस आल्याने रस्त्यामध्ये बांधलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या शेडमध्ये टेबल घेतले व त्याठिकाणी छत्री वाटप सुरु केले.याची माहिती मिळताच रुपाली मोदी पतीसह तेथे आल्या व इकडे काही कार्यक्रम करायचा नाही, आपल्या नगरसेवक निधीतून शेड बांधली असून परवानगी घेतली आहे का? चला बाहेर निघा, असे सर्वांना सांगू लागल्या. यावेळी बाचाबाची झाली आणि  जैन व मोदी यांच्यात धक्काबुक्की झाली. मोदींना जैन यांनी मागे ढकलले. तर मोदींच्या पतीला देखील उपस्थितांनी मागे ओढले. त्यावरुन ते शिवीगाळ करु लागले.शुल्लक कारणावरुन स्थानिक नगरसेविकेने छत्री वाटप न करण्यासाठी घातलेला धूडगुस पाहून उपस्थित नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली. पण त्यानंतर देखील छत्री वाटप पुढे सुरु करण्यात आले. जैन आणि मोदी यांच्यात बाचाबाची सुरुच होती.  दरम्यान, काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोदी या पतीसह पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. तर पोलिसांनी इमरान यांना सुद्धा बोलावून घेत माहिती जाणून घेतली.

या घटनेमागे भाजपातील अंतर्गत संघर्ष कारणीभूत असल्याचे मानले जाते. मोदी या भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या समर्थक मानल्या जातात. तर माजी महापौर गीता जैन देखील भाजपाच्याच असून त्यांनी मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातून भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न चालविले आहे. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु आहे. निवडणूक जवळ येऊ लागल्याने वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. याआधी देखील जैन यांना पक्षाच्या कारणे दाखवा नोटिसा बजावण्यापासून त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेली आहेत. महासभेत देखील मेहता समर्थक भाजपा नगरसेवकांकडून जैन यांना लक्ष्य केले होते.

टॅग्स :mira roadमीरा रोडBJPभाजपा