BJP Kirit Somaiya agitation in front of Thane Municipal Corporation against ShivSena Pratap Sarnaik | शिवसेना आमदाराविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्यांचे ठाणे महापालिकेसमोर आंदोलन

शिवसेना आमदाराविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्यांचे ठाणे महापालिकेसमोर आंदोलन

ठाणे  : ठाणे विहांग गार्डन चे बी 1 आणि बी 2 बिल्डिंगचे 13 मजले अनधिकृत असल्याचा दावा करत या अनधिकृत बांधकामांमुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे नेते किरीट सोमाया यांनी 
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे पोलिसांकडे केली होती. पण मागणी करुन देखील प्रताप सरनाईक यांच्या विरोधात कोणतीच कारवाई न झाल्याने आज भाजपा नेते किरीट सोमैय्या, आमदार निरंजन डावखरे आणि भाजपा पदाधिकारी यांनी ठिकाणी आंदोलन केले. 

ठाणे महानगरपालिकेसमोर हे ठिय्या आंदोलन करत प्रताप सरनाईक यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदेलन केलं जाईल असा इशारा यावेळेस किरीट सोमैय्या यांना दिला. ठाणे महानगरपालिके समोर हे ठिय्या आंदोलन अवघे ५ ते १० मिनिटे करुन देण्यात आले आणि लगेच नौपाडा पोलिसांनी किरीट सोमैय्या यांच्यासह सर्व भाजपा पदाधिका-यांना ताब्यात घेऊन नौपाडा पोलिस स्टेशनला नेले.

Web Title: BJP Kirit Somaiya agitation in front of Thane Municipal Corporation against ShivSena Pratap Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.