शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

नेवाळी, मलंगगडवाडी, नाऱ्हेन ग्रा.पं.वर भाजपचे वर्चस्व, बुर्दूल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात; बदलापूर ग्रामीणमध्ये शिवसेेनेचा वरचष्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 09:21 IST

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर मलंगगड भागातील नेवाळी, मलंगगडवाडी, नाऱ्हेन या ग्रामपंचायतींवर भाजपने आपले सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहेत.

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यात भाजपचे तर बदलापूर ग्रामीण भागात शिवसेनेने वर्चस्व निर्माण केले आहे. यंदाच्या निवडणुकीत मनसेने काकोळे ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर मलंगगड भागातील नेवाळी, मलंगगडवाडी, नाऱ्हेन या ग्रामपंचायतींवर भाजपने आपले सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा मलंगगडचा बालेकिल्ला ढासळला आहे. नेवाळी ग्रामपंचायतीवर असलेली शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणत भाजपने या ठिकाणी आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. आता बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले असून ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीही शिवसेनेला ताब्यात ठेवण्यात अपयश आले आहे. नेवाळी ग्रामपंचायतीत शिवसेनेला सर्वाधिक फटका बसला आहे. शिवसेना पुरस्कृत पॅनलमधून फक्त दोन उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजप पुरस्कृत पॅनलमधून नऊ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर उसाटने ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता सर्वाधिक आहे. खरड ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची असलेली सत्ता महाविकास आघाडीने कायम ठेवली आहे. नाऱ्हेन ग्रामपंचायतीवर भाजपने आपले सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहेत. बुर्दूल ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवले आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कौटुंबिक लढाया सर्वाधिक झाल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये सर्वाधिक रंग आले होते. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व असून भाजप आठ जागांवर, राष्ट्रवादी ४ जागांवर, मनसे एक जागेवर तर महाविकास आघाडी तीन जागांवर विजयी झाली. विजयाची आकडेवारी सरपंच निवडणुकीपर्यंत कायम राहते की घोडेबाजारानंतर ही आकडेवारी बदलते याची उत्सुकता आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकthaneठाणेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस