उल्हासनगरात भाजपाने लावला कलानी साम्राज्याला सुरुंग, कलानी समर्थक माजी नगरसेवकासह इतर भाजपात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:25 IST2025-09-05T15:25:42+5:302025-09-05T15:25:52+5:30

उल्हासनगर महापालिकेवर झेंडा फडकविण्याचा निर्धार भाजपाने केला असून पक्षात मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू झाली.

BJP cracks down on Kalani empire in Ulhasnagar, Kalani supporter, former corporator and others join BJP | उल्हासनगरात भाजपाने लावला कलानी साम्राज्याला सुरुंग, कलानी समर्थक माजी नगरसेवकासह इतर भाजपात दाखल

उल्हासनगरात भाजपाने लावला कलानी साम्राज्याला सुरुंग, कलानी समर्थक माजी नगरसेवकासह इतर भाजपात दाखल

सदानंद नाईक
उल्हासनगर :
समर्थकाच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लावण्याला ओमी कलानी हे गेल्या महिन्यात यशस्वी झाले होते. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी कलानी समर्थक माजी नगरसेवकासह इतर पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश करून, कलानी साम्राज्याला सुरुंग लावण्यात भाजपा यशस्वी झाली.

उल्हासनगर महापालिकेवर झेंडा फडकविण्याचा निर्धार भाजपाने केला असून पक्षात मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू झाली. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगरसेवकासह समर्थकांचा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला. तर गुरुवारी कलानी समर्थक माजी नगरसेवक सुजित चक्रवर्ती, छाया चक्रवर्ती, हेमा पिंजानी, प्रभुनाथ गुप्ता, संजय सिंग, बाबू गुप्ता, मंगल वाघे, सुचित्रा सिंग, सूरज भारवानी, किशन लचानी, चांदनी श्रीवास्तव, मनीषा मेथवानी, दशरथ खैरनार यांच्यासह अन्य जणांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपच्या सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, प्रवक्ते श्वेता शालिनी, आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया आदी जण उपस्थित होते.

 महापालिका निवडणूकीपूर्वी भाजपात मोठ्या इनकमिंगची शक्यता शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी व्यक्त केली. कधीकाळी कलानीचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या वधारिया यांनी भाजपात प्रवेश करून स्वकर्तृत्वावर भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष पद पटकाविले असून कलानी साम्राज्याला सुरुंग लावण्यात महत्वपूर्ण भूमिका वठविली. भाजपाच्या प्रवेशवेळी पक्षाचे माजी शहरजिल्हाध्यक्ष लाल पंजाबी, महेश सुखरमानी, जमनु पुरस्वानी, प्रकाश माखीजा, प्रदीप रामचंदानी, प्रशांत पाटील, राजू जग्यासी, रामचार्ली पारवानी, अमित वाधवा, दीपक छतलानी, मनोज साधनानी, अवि पंजाबी, अमर लुंड, शेरी लुंड, नवीन दुसेजा, लकी नथानी, डॉ. एस.बी. सिंग यांच्यासह पदाधिकारी, माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: BJP cracks down on Kalani empire in Ulhasnagar, Kalani supporter, former corporator and others join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.