प्रताप सरनाईक मातोश्रीवर असल्याचा भाजपाचा आरोप; आमदारांना शोधून देण्याबाबत घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 02:08 PM2021-06-19T14:08:06+5:302021-06-19T14:09:02+5:30

आमदार गायब झाल्याची स्थानिक मतदारांनी केली तक्रार

BJP accuses ShivSena MLA Pratap Sarnaik of being Matoshri; Proclamation about finding MLA | प्रताप सरनाईक मातोश्रीवर असल्याचा भाजपाचा आरोप; आमदारांना शोधून देण्याबाबत घोषणाबाजी

प्रताप सरनाईक मातोश्रीवर असल्याचा भाजपाचा आरोप; आमदारांना शोधून देण्याबाबत घोषणाबाजी

Next

ठाणे: ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक हे गायब झाल्याची तक्रार शनिवारी भारतीय जनता पक्षाने स्थानिक मतदार यांच्यासोबतीने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जाऊन केलीे. दरम्यान यावेळी भाजप आमदार, माजी खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार झाले Mr.india असे बॅनर हाती घेऊन mr india आमदारांना शोधून देण्याबाबत घोषणाबाजी केली. तसेच याप्रसंगी आमदार सरनाईक हे मातोश्रीवर असल्याचा खळबळजनक आरोपही भाजपने केला.          

स्थानिक मतदार मिलिंद नईबागकर आणि हरीष जोशी यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. त्यामध्ये राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. मात्र ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार मतदारांसाठी कुठल्याही प्रकारची मदत करताना दिसत नाहीत.जवळजवळ १०० दिवस झाले आहे. ते गायब होवून ते कुठे हरवले आहेत. असा उगाच संशय निर्माण होत आहे. किंवा त्यांना कुणी गायब केले आहे का? या सर्व बाबींचा तपास करून आमदार सरनाईक यांचा शोध घ्यावा.अशी मागणी त्या लेखी तक्रारीत केली आहे.

ही तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे करताना त्या दोघांच्या सोबत ठाणे जिल्हा प्रभारी खासदार किरीट सोमय्या, जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांच्यासह सीताराम राणे व आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी मिस्टर इंडिया झालेल्या आमदारांना शोध देण्याची मागणी केली. तसेच आमदार झाले mr.india असे बॅनर हाती घेतले होते.  यावेळी, प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार सरनाईक हे मातोश्रीवरच असल्याचा धक्कादायक आरोप केला. ते मातोश्री वर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची मातोश्रीवर चौकशी करा यासाठी आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यात आलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP accuses ShivSena MLA Pratap Sarnaik of being Matoshri; Proclamation about finding MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app