बिल्कीस बानो बलात्कार प्रकरण ठाण्यात राष्ट्रवादी महिला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2022 16:46 IST2022-08-27T16:45:49+5:302022-08-27T16:46:15+5:30

देशात काही चाललं आहे ते बरोबर नाही वातावरण पूर्णपणे बिघडलेला आहे. देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही हाच मोठा प्रश्न असल्याचे ऋताताई आव्हाड म्हणाल्या.

Bilquis Bano rape case NCP women aggressive in Thane | बिल्कीस बानो बलात्कार प्रकरण ठाण्यात राष्ट्रवादी महिला आक्रमक

बिल्कीस बानो बलात्कार प्रकरण ठाण्यात राष्ट्रवादी महिला आक्रमक

ठाणे - बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात  सुटका झालेल्या आरोपी विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आक्रमक होत केंद्र सरकार आणि गुजरात सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष ऋता ताई आव्हाड यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. देशात काही चाललं आहे ते बरोबर नाही वातावरण पूर्णपणे बिघडलेला आहे. देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही हाच मोठा प्रश्न असल्याचे ऋताताई आव्हाड म्हणाल्या. बलात्कार प्रकरणी सुटका झालेल्या आरोपींना सत्कार करणं त्यांना पेढे भरवणं हे दुर्दैव आहे. देशात एकीकडे भेटी बचाव बेटी पढाव अशा प्रकारचे बोलले जाते मात्र दुसरीकडे बलात्कारांना सोडण्यात येत यामुळे वाईट संदेश जातो. त्यामुळे बलात्कारांना पुन्हा कठोर शिक्षा  देण्याची मागणी महिलांनी केली

Web Title: Bilquis Bano rape case NCP women aggressive in Thane