दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:47+5:302021-06-18T04:27:47+5:30

---- बतावणी करीत दागिने लुटले डोंबिवली : साडी देण्याचा बहाणा करीत दोन अनोळखी व्यक्तींनी प्रतिभा सावंत (रा. ठाकूरवाडी) ...

Bike theft | दुचाकीची चोरी

दुचाकीची चोरी

Next

----

बतावणी करीत दागिने लुटले

डोंबिवली : साडी देण्याचा बहाणा करीत दोन अनोळखी व्यक्तींनी प्रतिभा सावंत (रा. ठाकूरवाडी) यांच्या अंगावरील ९० हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी सकाळी ११.१५ ते ११.३० दरम्यान पंडित दीनदयाळ रोडवर घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात सावंत यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

--------------

घरफोडीत ४५ हजारांचे दागिने चोरीला

डोंबिवली : पूर्वेतील पांडुरंगवाडी परिसरातील ब्रह्मचैतन्य सोसायटीत राहणारे आशिष चंद्रुवा यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातील ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ७ च्या दरम्यान भरदिवसा घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

------------

घर खरेदीच्या व्यवहारात फसवणूक

डोंबिवली : घर विकत देतो, असे सांगून त्या व्यवहारापोटी सहा लाख ९० हजार रुपये घेत मृत श्यामराव गोडे यांच्या नावाने बनावट दस्तावेज बनवून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कुमार राम म्हात्रे याच्याविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राजाराम पाटील यांनी तक्रार दिली आहे. ८ एप्रिल २०१९ ते १४ ऑगस्ट २०२० या कालावधीत खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

----

‘कर्ज हप्ते पुनर्रचना मुदतवाढ मिळावी’

कल्याण : रिक्षाचालकांना थकीत कर्ज पुनर्रचना व मुदतवाढीकरिता नियमांमध्ये शिथिलता द्यावी जेणेकरून रिक्षाचालकांना दिलासा मिळेल, अशी मागणी कोकण रिक्षा-टॅक्सी महासंघाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना संकटकाळात रिक्षाचालक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्या रिक्षाचालकांना एकरकमी कर्ज भरणे अशक्य असल्याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे.

---------------------------

‘पोलिसांची गस्त वाढवा’

कल्याण : ज्येष्ठालाल देरासरी मार्ग, ओकबाग, सर्वाेदय गार्डन, भानुसागर, लोकउद्यान, सांगळेवाडी, रहेजा येथे भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला आहे. येथे महिलांचे दागिने, मोबाइल चोरी घटना घडत आहेत. यामुळे याठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.

------------------

संगणकाचे वाटप

डोंबिवली : मनसेचे डोंबिवली शहर संघटक योगेश रोहिदास पाटील यांनी आपल्या वाढदिवशी सामाजिक बांधिलकी जपत अंबरनाथ येथील अनाथ आश्रमाला संगणक आणि पोषक आहाराचे वाटप केले. सध्या कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने संगणकामुळे येथील अनाथ मुलांना मोलाची मदत मिळाली आहे.

----

दुभाजकाला धडक

डोंबिवली : पूर्वेकडील पेंढरकर महाविद्यालय रोडवर रोटरी उद्यानासमोर असलेल्या दुभाजकावर वाहन आदळून अपघात होण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत. गुरुवारी सकाळी ८.३०च्या सुमारास काँक्रीटचा मिक्सर त्याच्यावर आदळून अपघात झाला. जोरदार धडकेत या वाहनाचे चाक निखळले होते. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दुभाजकाची रचना योग्यप्रकारे नसल्याने यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

----

Web Title: Bike theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.