ट्रकच्या धडकेत हाईट बॅरियर पडून दुचाकीस्वार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 19:12 IST2024-07-16T19:12:08+5:302024-07-16T19:12:37+5:30
याप्रकरणी ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ट्रकच्या धडकेत हाईट बॅरियर पडून दुचाकीस्वार जखमी
ठाणे: हाईट बॅरियरला ट्रकने धडक दिल्याने ते बॅरियर अंबादास जाधव (३१, रा. मुंबई) या दुचाकीस्वाराच्या अंगावर पडून तो किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही घटना आराधना टॉकीजच्या बाजूला असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. जखमी जाधव यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्या डोक्याला आणि पाठीला किरकोळ दुखापत झाली. ठाणे महापालिका अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्यांच्या मदतीने हाईट बॅरियरला धडकलेला ट्रक बाजूला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.