शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
2
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
3
सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक
4
Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
5
विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय
6
महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना
7
जो संघ Qualifier 1 खेळलाय तोच चॅम्पियन ठरल्याचा इतिहास! एक अपवाद त्यात RCB ला पराभवाचा टॅग
8
फॉर्च्युनर, मोबाईल घेऊन हगवणेंच्या मनाला शांती नाही; अधिक महिन्यात सोने, चांदीची ताट मागितली - अनिल कस्पटे
9
सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात दिसला; भारतविरोधी रॅलीत हाफिज सईदच्या मुलाचीही उपस्थिती
11
तपासणीदरम्यान कारमध्ये सापडलं घबाड, रोकड मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, आता इन्कम टॅक्स विभागाकडून तपास सुरू   
12
डॉलरचं स्वप्न, हिमवादळाचा तडाखा अन् मृत्यू; मानवी तस्करांच्या जाळ्यात 'असं' अडकलं भारतीय कुटुंब
13
"ही बघा पावती! मी हेक्टर देत होतो, पण त्यांनी फॉर्च्युनरच मागितली"; वैष्णवीच्या वडिलांनी सगळंच सांगितलं
14
"दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत आणि आपले खासदारही...", जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद
15
क्रेडिट कार्डचे नियम, एलपीजी सिलेंडरच्या...; १ जूनपासून हे ५ मोठे बदल होणार; तुमच्या खिशावर परिणाम होणार
16
Astro Tips: शुक्रवारी 'या' कुबेर मंत्राचा जप करा, दु:ख, दरीद्र्याला घरातून कायमचे घालवा!
17
पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत लावलं जातं लग्न; काय आहे 'करेवा विवाह'?, दिल्ली हायकोर्टासमोर पेच
18
शशांक, लता, करिश्माला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सासू, नणंदेचा लगेचच जामिनासाठी अर्ज
19
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा नकार ऐकून बॉयफ्रेंडने कहरच केला, घरावर ग्रेनेड फेकला अन्... 
20
कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त

ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:40 IST

Uddhav Thackeray Group News: आजपासूनच कामाला लागणार आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला, असे शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी आमदारांनी सांगितले.

Uddhav Thackeray Group News: मुंबईसह राज्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. एकीकडे महापालिका निवडणुका महायुतीत लढल्या जाणार असल्याचे म्हटले जात असले तरी ठाकरे गटाला मुंबई पालिकेच्या निवडणुकीतून हद्दपार करण्याचा चंग भाजपाने बांधलेला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाचे निम्मे माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. यातच आता ठाकरे गटातील नाशिकमधील माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे. निर्मला गावित यांनी शिवसेना शिंदे गटात केलेला प्रवेश उद्धवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशावेळी मोठ्या प्रमाणात महिलाही शिवसेना शिंदे गटात सामील झाल्याचे म्हटले जात आहे. 

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश संपन्न होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१९ ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदलले आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच कामाला लागणार आहे, असे मनोगत निर्मला गावित यांनी बोलून दाखवले.

१५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला 

नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार निर्मला गावित तसेच उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. निर्मला गावित यांच्यासोबत श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आघार समितीचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या उबाठाच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित, सोमनाथ जोशी, मोतीराम दिवे, गणपत वाघ, मथुराताई जाधव, संदिप शिवराम जाधव, गणेश जाधव, साहेबराव धोंगडे, शरद कुटके, गुलाबराव वाजे, रमेश शिंदे, विलास मालुंजकर, अंबादास माडी, मधुकर पंडित झोले, नाना वारे, रमेश शेंडे, रमेश भोये, दिलीप घोरपडे, तुकाराम चौधरी, लालचंद चव्हाण, पवन दळवी, पुंडलिक कनोजे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, सगळ्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा. बहिणी मोठ्या संख्येने दिसत आहेत. भाऊ कमी आहेत. आधी एक दराडे आले. मग मी म्हणालो, राम आलाय लक्ष्मण कुठे आहे? म्हणून मग लक्ष्मणला पण आणले. निर्मला गावित यांचे स्वागत आहे. हे आनंद दिघे यांचे ठाणे आहे. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजना कदापि बंद होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने टप्प्याटप्याने पूर्ण करणार. विरोधकांचा तुम्ही सुफडा साफ केला. सर्व मागण्या गोरगरिबांच्या आहेत. सरकार गोरगरिबांचे आहे. सरकार आणि तुम्ही वेगळे नाहीत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे काम करण्याचे आवाहन नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना केले. शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या महिलांचा मानधनवाढीचा विषयाबाबत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून सकारात्मक मार्ग काढू असे शिंदे यांनी आश्वस्त केले.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNashikनाशिक