ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:40 IST2025-05-28T14:38:01+5:302025-05-28T14:40:56+5:30

Uddhav Thackeray Group News: आजपासूनच कामाला लागणार आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला, असे शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी आमदारांनी सांगितले.

big setback to thackeray group in nashik former mla nirmala gavit say goodbye to uddhav sena and join shiv sena shinde group | ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश

Uddhav Thackeray Group News: मुंबईसह राज्यातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. एकीकडे महापालिका निवडणुका महायुतीत लढल्या जाणार असल्याचे म्हटले जात असले तरी ठाकरे गटाला मुंबई पालिकेच्या निवडणुकीतून हद्दपार करण्याचा चंग भाजपाने बांधलेला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाचे निम्मे माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. यातच आता ठाकरे गटातील नाशिकमधील माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे. निर्मला गावित यांनी शिवसेना शिंदे गटात केलेला प्रवेश उद्धवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशावेळी मोठ्या प्रमाणात महिलाही शिवसेना शिंदे गटात सामील झाल्याचे म्हटले जात आहे. 

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश संपन्न होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१९ ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदलले आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच कामाला लागणार आहे, असे मनोगत निर्मला गावित यांनी बोलून दाखवले.

१५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला 

नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार निर्मला गावित तसेच उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. निर्मला गावित यांच्यासोबत श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आघार समितीचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या उबाठाच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित, सोमनाथ जोशी, मोतीराम दिवे, गणपत वाघ, मथुराताई जाधव, संदिप शिवराम जाधव, गणेश जाधव, साहेबराव धोंगडे, शरद कुटके, गुलाबराव वाजे, रमेश शिंदे, विलास मालुंजकर, अंबादास माडी, मधुकर पंडित झोले, नाना वारे, रमेश शेंडे, रमेश भोये, दिलीप घोरपडे, तुकाराम चौधरी, लालचंद चव्हाण, पवन दळवी, पुंडलिक कनोजे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, सगळ्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा. बहिणी मोठ्या संख्येने दिसत आहेत. भाऊ कमी आहेत. आधी एक दराडे आले. मग मी म्हणालो, राम आलाय लक्ष्मण कुठे आहे? म्हणून मग लक्ष्मणला पण आणले. निर्मला गावित यांचे स्वागत आहे. हे आनंद दिघे यांचे ठाणे आहे. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजना कदापि बंद होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने टप्प्याटप्याने पूर्ण करणार. विरोधकांचा तुम्ही सुफडा साफ केला. सर्व मागण्या गोरगरिबांच्या आहेत. सरकार गोरगरिबांचे आहे. सरकार आणि तुम्ही वेगळे नाहीत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक याप्रमाणे काम करण्याचे आवाहन नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना केले. शालेय पोषण आहार योजनेसाठी काम करणाऱ्या महिलांचा मानधनवाढीचा विषयाबाबत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून सकारात्मक मार्ग काढू असे शिंदे यांनी आश्वस्त केले.

 

Web Title: big setback to thackeray group in nashik former mla nirmala gavit say goodbye to uddhav sena and join shiv sena shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.