Mumbai Local: ट्रान्स-हार्बर लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका असल्याने खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:02 IST2025-05-09T09:55:04+5:302025-05-09T10:02:06+5:30
Mumbai Trans Harbour Local Train Update: ठाणे स्टेशन वरील पनवेलकडे जाणारी हारबर्लाइन वरील वाहतूक बंद झाली आहे.

Mumbai Local: ट्रान्स-हार्बर लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका असल्याने खबरदारी
ठाणे -ठाणे स्टेशन वरील पनवेलकडे जाणारी हारबर्लाइन वरील वाहतूक बंद झाली आहे. यामुळे स्टेशन वर गर्दी वाढली आहे. ही सेवा अनिश्चिच काळासाठी बंद करण्यात आली आहे. तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका असल्याने रेल्वे सेवा ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी सकाळी ऐरोली येथे रात्रीच्या बांधकामादरम्यान गर्डर चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट झाल्यामुळे मुंबईच्या ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय झाली. गर्दीच्या वेळी हजारो दैनंदिन प्रवासी अडकून पडले, या प्रवाशांनी आता बसचा पर्याय शोधला आहे.
ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा सकाळी ७:१० वाजल्यापासून बंद करण्यात आली . त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काल रात्री बसवण्यात आलेले गर्डर पडले.
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडला pic.twitter.com/k4ztIFbjtW
— Lokmat (@lokmat) May 9, 2025
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “ठाणे आणि ऐरोली दरम्यान लॉन्च गर्डर लावण्यासाठी MMRDA ने ट्रान्स हार्बर लाईनवर रात्री १.०० ते ४.०० पर्यंत ब्लॉक घेतला होता. लॉन्च केलेले गर्डर झुकलेले असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे ७.१० वाजल्यापासून वाहतूक बंद आहे.
गर्डर दुरुस्त करण्याचे काम सकाळी ८:१५ वाजता सुरू झाले आहे. हे काम काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही.