ठाणेकरांसाठी मोठी बातमी: मेट्रो स्टेशनच्या छत उभारणीसाठी शहरात १५ दिवस वाहतूक बदल; असा करावा लागेल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 06:18 IST2025-04-06T06:18:16+5:302025-04-06T06:18:35+5:30

माजीवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागणार आहे.

Big news for Thane residents Traffic changes in the city for 15 days for construction of the roof of the metro station | ठाणेकरांसाठी मोठी बातमी: मेट्रो स्टेशनच्या छत उभारणीसाठी शहरात १५ दिवस वाहतूक बदल; असा करावा लागेल प्रवास

ठाणेकरांसाठी मोठी बातमी: मेट्रो स्टेशनच्या छत उभारणीसाठी शहरात १५ दिवस वाहतूक बदल; असा करावा लागेल प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदर भागात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माजीवडा मेट्रो स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर ५ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान मेट्रोचे छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. त्यावर जॅक बीम टाकून जॅक बीम उभारल्यानंतर राफ्टर उभारला जाणार आहे.

या काळात येथील वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे वाहतूक विभागाने दिली आहे. परंतु या कामामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडण्याची चिन्हे दिसत आहे. येथील काम ६० टनी मोबाइल क्रेनच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी ही क्रेन मुंबई, नाशिक, घोडबदंर, माजीवडा उड्डाणपुलावरील मुख्य वाहिनीवर ज्युपिटर चढणी या ठिकाणी उभी करून हे काम होणार आहे. त्यासाठी माजीवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागणार आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत.

येथून वाहतूक बंद, असा करावा लागेल प्रवास
मुंबईकडून घोडबंदर अथवा भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना विवियाना मॉल समोरील ब्रीज चढणीच्या सुरुवातीला दुभाजकाजवळ प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने ज्युपिटर हॉस्पिटल समोरील स्लीप रोडने जाऊन कापूरबावडी मार्गे इच्छीत स्थळी जातील.
नाशिककडे जाणाऱ्या वाहनाही ब्रिज चढणीच्या सुरुवातीला प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यांनाही स्लीप रोडने जाऊन गोल्डन क्रॉसमार्गे पुढे जावे लागणार आहे. हे वाहतूक बदल ५ एप्रिल पासून १९ एप्रिलपर्यंत रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

Web Title: Big news for Thane residents Traffic changes in the city for 15 days for construction of the roof of the metro station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.