उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का, धीरज ठाकूर यांचा समर्थकासह शिवसेनेत प्रवेश
By सदानंद नाईक | Updated: October 1, 2022 15:42 IST2022-10-01T15:42:14+5:302022-10-01T15:42:55+5:30
Ulhasnagar BJP: भाजपचे पदाधिकारी धीरज ठाकूर शेकडो समर्थकासह आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतून प्रवेश घेतला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवाअधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यासह शेकडोजन उपस्थित होते.

उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का, धीरज ठाकूर यांचा समर्थकासह शिवसेनेत प्रवेश
- सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजपचे पदाधिकारी धीरज ठाकूर शेकडो समर्थकासह आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतून प्रवेश घेतला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवाअधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यासह शेकडोजन उपस्थित होते.
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य असलेले धिरज विनोद ठाकुर यांचा शनिवारी मातोश्रीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकासह शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई, उल्हासनगरशिवसेनाप्रमुख राजेंद्र चौधरी, युवाधिकारी बाळा श्रीखंडे, आदी जण उपस्थितीत होते. उपजिल्हा युवा अधिकारी अँड केतन नलावडे, विभाग प्रमुख सुरेश सोणावने, अनिल(लाल्या)कुंचे, उपविभाग प्रमुख राजु चिकणे, शहर समन्वयक राजेश कणसे, उपशहर अधिकारी ज्ञानेश्वर मरसाळे, पप्पू जाधव, रमेश कांबळे, हरी पवार, रुपेश मोहिते, राकेश चिकणे, तुषार बांदल, प्रतिम पाटील यांच्यासह शेकडो जण उपस्थित होते. शहरात शिवसेना वाढीसाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया धीरज ठाकूर यांनी दिली.
धीरज ठाकूर यांच्या शिवसेना प्रवेशा बाबत भाजप आमदार कुमार आयलानी यांच्याशी संपर्क केला असता, धीरज ठाकूर एकेकाळी भाजपचा पदाधिकारी होता. आता भाजप मध्ये आहे की नाही. याबाबत माहिती घ्यावी लागेल. अशी प्रतिक्रिया दिली. धीरज ठाकूर यांच्या प्रवेशाने युवसेनेची ताकद वाढल्याची प्रतिक्रिया युवाधिकारी बाळा श्रीखंडे यांनी दिली. तर निवडणुकी पूर्वी अनेक भाजप पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याचे संकेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिले.