शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

काँग्रेसला मोठा धक्का; अजित पवारांच्या उपस्थितीत 16 नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

By मुकेश चव्हाण | Updated: December 23, 2020 16:50 IST

भिवंडीतील काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

भिवंडी महापालिकेतील महापौरपदाच्या निवडीपासून सुरु असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसला आहे. काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादामुळे काँग्रेसचे 16 नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेससह दौंड येथील रासपच्या काही कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. 

भिवंडीतील काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. या सर्व नगरसेवकांनी भाजपाला मदत केली म्हणून काँग्रेस पक्षाने नोटीस दिली होती. त्यानंतर आता या नगरसेवकांनी काँग्रेसलाच हात दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.

तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, चंद्रकांत कारंडे, दादासो भिसे, जनार्दन सोनवणे, प्रकाश टिळेकर, अशोकराव बोराटे, संतोष जाधव, शिवराम ताम्हाणे, आतिष बोराटे, सतिश खुने, बिभिषण खुने, संतोष ढोरले यांचा प्रवेश झाला, असं ट्विट राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 16 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला असून 2 नगरसेवक बाहेरगावी असल्याने आज त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही लवकरच त्या दोघांचाही पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीत होणार असून या पक्ष प्रवेशाने आपल्या प्रयत्नांना निश्चितच यश आले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जावेद फारुकी यांनी दिली आहे. तर जावेद फारुकी यांच्या प्रतिक्रियेला राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र मंत्री आव्हाड यांच्या नेतृत्वाखालीच या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद होऊ नये यासाठी खुद्द  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना पक्षप्रवेशासाठी नकार दिला होता. मात्र सर्व नगरसेवकांनी एकाकी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. 

दरम्यान, मनपात राष्ट्रवादीचे संख्याबळ नसतांनाही काँग्रेसच्या 16 नगरसेवकांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने राष्ट्रवादीची शहरातील ताकद वाढली आहे. विशेष म्हणजे महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी कोणार्क विकास व भाजपशी हात मिळवणी केल्याने अवघ्या 4 नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीकडे महापौर पद आले आहे. त्यामुळे एकूण 90 नगरसेवक संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे एकहाती 47 नगरसेवक असतांना अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्ककडे महापौर पद गेल्याने काँग्रेस नेतृत्वाबरोबरच काँग्रेसच्या 18 नगरसेवकांवर निलंबनाची टांगती तालावर आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवारBhiwandiभिवंडीthaneठाणे