भिवंडीकरांनो आपली मुले सांभाळा; एकाच दिवसात दोन लहान मुलांचे अपहरण
By नितीन पंडित | Updated: March 31, 2023 19:32 IST2023-03-31T19:32:49+5:302023-03-31T19:32:57+5:30
अपहरणाच्या दोन घटना घडल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

भिवंडीकरांनो आपली मुले सांभाळा; एकाच दिवसात दोन लहान मुलांचे अपहरण
भिवंडी: एकाच दिवसात दोन लहान मुलांचे अपहरण झाल्याच्या दोन घटना गुरुवारी शहरात घडल्या आहेत.अपहरणाच्या या दोन घटनांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.एकाच दिवसात अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या दोन घटना घडल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहिल्या घटनेत भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मानसरोवर फुलेनगर येथील सात वर्षांचा ओमकार परमेश्वर साळवे हा खेळायला जातो असे घरी सांगून गेला होता मात्र उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने मुलाचे वडील परमेश्वर साळवे यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
दुसऱ्या घटनेत नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजीव गांधी नगर झोपडपट्टी परिसरातील दहा वर्षांचा किसन अरुणकुमार गौंड या मुलगा राहत्या घराजवळून कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार किसनचे वडील अरुणकुमार गौंड यांनी नारपोली पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे.