भिवंडीत महिलेची साडेसात लाखांची ऑनलाइन फसवणूक; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
By नितीन पंडित | Updated: April 20, 2024 18:11 IST2024-04-20T18:10:51+5:302024-04-20T18:11:13+5:30
मात्र कोणताही परतावा परत मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे महिलेस समजल्यानंतर त्यांनी कॉल करणाऱ्या अज्ञात कंपनी व मोबाईल धारकां विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

भिवंडीत महिलेची साडेसात लाखांची ऑनलाइन फसवणूक; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी: व्हाट्सअप व टेलिग्राम साइटवर ऑनलाइन टास्क पूर्ण करून आर्थिक मोबदला मिळण्याचे आमिष दाखवून महिलेची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी शुक्रवारी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरती रामप्रसाद गुप्ता वय २८ वर्ष असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून तिला एका मार्केटिंग कंपनीकडून व्हाट्सअप वर टेलीग्राम या समाज माध्यमाच्या साइटवरून टास्क पूर्ण केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवून वेगवेगळ्या कंपनीच्या खात्यात ७ लाख ६६ हजार ७७० रुपये रुपये भरण्यास सांगितले.मात्र कोणताही परतावा परत मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे महिलेस समजल्यानंतर त्यांनी कॉल करणाऱ्या अज्ञात कंपनी व मोबाईल धारकां विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे