शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

नुकसान दिसत असूनही भिवंडी महापालिकेचे शौचालयचालकांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:48 AM

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, असे ढोल प्रशासनातर्फे नेहमीच वाजवले जात आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी राज्य सरकार सढळ हाताने मदत करत आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, असे ढोल प्रशासनातर्फे नेहमीच वाजवले जात आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी राज्य सरकार सढळ हाताने मदत करत आहे. परंतु, महापालिका प्रशासनातील अधिकारी त्या निधीचा कधी गैरवापर, तर कधी त्याची उधळपट्टी करत आहेत. परिणामी, नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.भिवंडी शहराचा समावेश एमएमआर क्षेत्रात झाला आहे. एमएमआरडीएने गरिबांची सोय व्हावी आणि शहरात स्वच्छता राहावी, यासाठी एमएमआरडीएने २१० शौचालये बांधण्यासाठी निधी दिला. परंतु, प्रत्यक्षात २०७ शौचालयेच उभी राहिली. त्यापैकी ११० शौचालयांची देखभाल शहराबाहेरील संस्थाचालकांना दिली आहे. मात्र, या संस्थाचालकांनी शौचालयांचा ताबा घेतल्यापासून आठ वर्षांत पालिकेकडे पाणीपट्टी व मलकर भरलेला नाही. शौचालयांचीही दुरुस्ती केलेली नाही. त्याचप्रमाणे संस्थाचालकांना पालिका कार्यालयांकडून वारंवार नोटीस बजावूनही संस्थाचालकांचे लेखापुस्तक, लेखापरीक्षण, मासिकपास व स्वच्छतागृहाच्या वास्तू, वस्तुस्थितीचा अहवाल आरोग्यनिरीक्षक व प्रभाग अधिकाºयांनी वरिष्ठांना दिलेला नाही. त्यामुळे संस्थाचालक पालिकेच्या कराराचा भंग करत असल्याचे सत्य आजवर समोर येऊ शकले नाही. किंबहुना, हे उघड होऊ नये, यासाठी पालिकेचे आरोग्य निरीक्षक व विभागीय अधिकारी, याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या शौचालयांचे संस्थाचालक परिसरातील कुटुंबांकडून व घरटी दरमहा २० रुपये घेण्याऐवजी प्रत्येक माणसाकडून २ ते ५ रुपये घेत गोरगरिबांची लूट करत आहेत.स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात हगणदारीमुक्त शहर न झाल्यास शासनाचे अनुदान बंद होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बंद असलेल्या २९ शौचालयांच्या दुरुस्तीसाठी ८४ लाख रुपये मंजूर केले. या निधीतून सहा महिन्यांपूर्वी शौचालयांची दुरुस्ती झाली. मात्र, ही शौचालये सुरू केलेली नाहीत, तर पालिकेच्या बांधकाम विभागाने पुन्हा शहरातील ८० शौचालयांच्या दुरु स्तीसाठी पाच कोटी १६ लाखांच्या निविदा काढल्या आहेत. त्याचे कामही लवकरच चालू होणार आहे. त्यात सहा महिन्यांपूर्वी दुरुस्त केलेल्या काही शौचालयांचाही समावेश आहे.वास्तविक, कराराप्रमाणे शौचालयांची निगा, दुरुस्ती संस्थाचालकाने करावयाची आहे. असे असतानाही त्याची शहानिशा न करता बांधकाम विभाग पालिकेच्या पैशांची उधळपट्टी करत आहे, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. शौचालयांचे संस्थाचालक शहरातील गोरगरिबांची लूट करत असल्याने शहरातील हजारो नागरिक उघड्यावर शौचालयास जात आहेत. हे वारंवार उघडकीस आले आहे. उघड्यावर बसलेल्या कामगार व गरिबांना पकडून आरोग्य निरीक्षकांनी पोलिसांच्या हवाली केले आहे. त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे. परंतु, शौचालयांच्या संस्थाचालकांवर काहीही कारवाई न करता त्यांना अभय देऊन पोसण्याचे काम पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाने आजतागायत केले आहे. शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी ठिकठिकाणी मीटिंग घेणे, बॅनर लावणे आदी कार्यक्रमांवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. परंतु, आठ वर्षांपासून शहरातील शेकडो संस्थाचालकांची मीटिंग घेऊन त्यांना जाब विचारला नाही. तसेच शहरातील शौचालयदुरुस्ती आवश्यक आहे काय? ती करण्यास संस्थाचालक असमर्थ आहे काय? चालकांनी शौचालयांची मागणी केली आहे काय? सहा महिन्यांपूर्वी केलेली दुरुस्ती लगेच कशी खराब झाली? संबंधितांवर कारवाई केली काय? याची शहानिशा न करता पालिकेच्या बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्याचा आरोप शहरातील समाजसेवी नागरिकांकडून होऊ लागला आहे.